कोकण रेल्वेमार्गावर दिवाळीसाठी विशेष फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

कणकवली -  दिवाळी सणासाठी कोकण रेल्वेमार्गावर १३ ते ३० ऑक्‍टोबर दरम्यान सहा 
विशेष गाड्या धावणार आहेत. सिंधुदुर्गातील कणकवली आणि कुडाळ या दोनच स्थानकांवर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काळात आखणी दिवाळी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 

लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी अशी ०१०४३ या क्रमांकाची गाडी १३ ते २७ ऑक्‍टोबर या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १.१० वाजता सुटलेली ही गाडी करमळी येथे दुपारी १२ वाजता पोचणार आहे, तर परतीची करमळी-टिळक टर्मिनस ०१०४४ या क्रमांकाची गाडी करमळी येथून दुपारी १ वाजता निघून टिळक टर्मिनस येथे मध्यरात्री १२.२० वाजता पोचणार आहे. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकावर थांबणार आहे. 

टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही विशेष गाडी १६ ते ३० ऑक्‍टोबर या दरम्यान प्रत्येक सोमवारी धावणार आहे. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी अशी ०११६७ या क्रमांकाची गाडी टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १.१० वाजता निघेल आणि सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता पोहोचणार आहे. तर परतीची सावंतवाडी-टिळक टर्मिनस ०११६८ या क्रमांकाची गाडी सावंतवाडी येथून दुपारी २.०५ वाजता निघेल आणि टिळक टर्मिनस येथे मध्यरात्री १२.३५ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकात थांबणार आहे.

Web Title: sindhudurg news konkan railway special train for Dipawali