कोकण विधानपरिषद निवडणूकीसाठी सिंधुदुर्गात 100 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सिंधुदुर्गनगरी - विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी आज जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात 100 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. 

केंद्र निहाय मतदान असे - कुडाळ - 56, कणकवली - 77, सावंतवाडी - 79 या प्रमाणे मतदान झाले. यासाठी जिल्ह्यात 212 मतदार होते. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 212 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, कणकवलीच्या प्रांताधिकारी निता सावंत-शिंदे यांनी मतदान प्रक्रियेची पहाणी केली. या निवडणुकीची मतमोजणी 24 ला रत्नागिरी येथे होणार आहे. 

Web Title: Sindhudurg News Konkan Vidhanparishad Election