त्या’ मच्छिमारी बोटींबाबतचा निर्णय मंगळवारी

त्या’ मच्छिमारी बोटींबाबतचा निर्णय मंगळवारी

मालवण - पारंपरिक मच्छीमारांनी गोव्याच्या बोटींवर एलईडी मासेमारीचे साहित्य असल्याने त्यादृष्टीने तहसीलदार यांनी चौकशी करावी, असे निवेदन आज तहसीलदार समीर घारे यांना देण्यात आले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने ॲड. उल्हास कुळकर्णी यांनीही शासनाची बाजू मांडली.

बोट मालकांच्या वतीने ॲड. रूपेश परुळेकर यांनी तातडीने बोटी सोडण्यात याव्यात, अशी बाजू लावून धरली. अखेर याप्रकरणी २० फेब्रुवारीला निर्णय देण्यात येईल, असे तहसीलदार यांनी जाहीर केले. त्यामुळे गोव्याच्या बोटींचा मालवण बंदरातील मुक्‍काम अजून तीन दिवस वाढलेला आहे.

दरम्यान, गोव्याच्या बोटींवरील मासळीची आणि साहित्याची लूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊजणांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मच्छीमारांच्या वतीने
ॲड. उल्हास कुळकर्णी, ॲड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कोठडीसाठी मच्छीमारांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे. मच्छीमारांना जामीन होण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.

इतर संशयित आणि बोटीवरील चोरीस गेलेले साहित्य जमा करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या संशयितांना पुन्हा पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने न्यायालयासमोर करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत सर्व संशयितांना न्यायालयानी कोठडी सुनावली. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालयाच्या आवाराबाहेर पारंपरिक मच्छीमारांची गर्दी झाली होती. आजही कडक बंदोबस्त होता.

स्थानिक मच्छीमारांतर्फे तहसीलदारांसमोर बाजू मांडताना ॲड. कुळकर्णी यांनी म्हटले, की गोव्याच्या बोटींवर एलईडी मासेमारी करण्याचे साहित्य होते. यामुळे तहसीलदार यांनी तिन्ही बोटींची स्वतः पाहणी करावी. एलईडी मासेमारीवर कडक निर्बंध असल्याने संबंधितांवर तशाप्रकारे कारवाई करण्यात यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com