आजगावात बिबट्याची वस्तीपर्यंत मजल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

शिरोडा -  रानावनात फिरणाऱ्या बिबट्याने आपला मोर्चा भरवस्तीत वळविला आहे. मंगळवारी (ता. ७) गोव्याहून परतणाऱ्या शिरोड्यातील युवकांना रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास बिबटा आजगाव रस्त्यावर समोर आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये तसेच गोव्याहून रात्रीच्यावेळी नोकरीवरुन परतणाऱ्या दुचाकीचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनखात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ तसेच नोकरधाऱ्यांकडून केली जात आहे. दशक्रोशीतील कित्येक युवक नोकरीनिमित्ताने दुचाकीवरुन गोव्याला जातात. रात्रीच्या वेळी त्यांचा परतीचा प्रवास असतो. या प्रवासात बऱ्याच जणांना शिरोडा-मळेवाड मार्गावर तिरोडा तिठा, वाघबीळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे प्रकार घडले. बिबट्याने आपला मोर्चा आजगावातील भरवस्तीत वळविला आहे. मंगळवारी (ता. ७) रात्री शिरोड्यातील गोडकर गोव्याहून परतत असताना रात्री ९.३० च्या सुमारास बिबटा तेलीवाडीतून येऊन रस्ता ओलांडून रेडकर यांच्या घरानजिकच्या पाणंदीतून जाताना दिसला. 

तेलीवाडीतील ग्रामस्थांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. भरवस्तीत बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन परतणाऱ्या नोकरधाऱ्यांमधून भिती व्यक्त केली जात आहे. वनखात्याने याबाबत वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Sindhudurg News leopard seen in Ajagaon

टॅग्स