पाडलोस पंचक्रोशीत बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - पाडलोस, मडुरा, न्हावेली परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा धाक निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचा प्रकार होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (ता. २२) रात्री निगुडे येथील दोन तरुणांना याचा प्रत्यय आला.

सावंतवाडी - पाडलोस, मडुरा, न्हावेली परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा धाक निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचा प्रकार होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (ता. २२) रात्री निगुडे येथील दोन तरुणांना याचा प्रत्यय आला.

न्हावेली, पाडलोस, निगुडे, मडुरा परिसरातील गावात असलेल्या जंगली भागातून बिबट्याकडून एक प्रकारे दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. नुकतेच पोलिस प्रवीण वालावलकर यांचा बिबट्याने पाठलाग केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बिबट्याकडून पाठलाग केल्याची घटना घडली. काल (ता. २२) रात्री सुमन निगुडकर व गुरू गवंडे हे दुचाकीवरून आरोंदा जत्रोत्सवाचा कार्यक्रम आटोपून परतत असतानाच पाडलोस गुंजाटे फार्म हाऊस येथे समोर बिबट्याचे दर्शन झाले. या वेळी बिबट्यासोबतच दोन बछडे होते. दरम्यान यावेळी त्यांनी सुसाट वेगाने गाडी हाकली. याच वेळी बिबट्याने मागे जाऊन पुन्हा एकदा दुचाकीचा जोराने पाठलाग सुरू केला. यावेळी दुचाकीस्वारांनी जोराने गाडी हाकून पळ काढला. 

अन्यथा बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली असल्याचा अनुभव दुचाकीस्वारांनी कथन केला. परिसरात पुन्हा पुन्हा ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशात रात्रीच्यावेळी दुचाकीवर उडी घेतल्याचे प्रकारही परिसरातील गावात गेल्यावर्षी घडल्या आहेत.

या मार्गावर काही वेळा नागरीकाचे येणे जाणेही असते अशावेळी पादचाऱ्याला बिबट्याकडून मोठे नुकसान होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीकांत बिबट्याच्या वावरतेमुळे मोठी निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही बिबट्याकडून भितीदायक घटना घडल्या आहेत. परिसरातील गावात याकाळात बिबटा सक्रिय होतो याची पूर्ण जाणिव वनविभागाला आहे. त्यामूळे वनविभागाने यात लक्ष घालून समस्येवर उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काही ग्रामंस्थानी दिला आहे.

Web Title: Sindhudurg News leopard seen in Padlos