कणकवलीत गोवा बनावटीच्या दारूसह 10 लाखाचा माल जप्त 

तुषार सावंत 
शुक्रवार, 4 मे 2018

कणकवली - गोव्याहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या अलिशान मोटारीमधून अवैधरित्या वाहतुक करण्यात येत असलेली  तब्बल एक लाख 80 हजाराची दारू जप्त करण्यात आली. जिल्हा वाहतुक पोलिस शाखेच्या पथकाने आज ही कारवाई करून दोघांना अटक केली आहे. मोटारीसह तब्बल दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.

कणकवली शहरातील गडनदी पुलावर वागदे येथे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अभय दिनेश मयेकर (वय 28 रा. कुडाळ पिंगुळी गुढीपूर) आणि शिवकुमार छदीलाल सरोज (वय 32 रा. झाराप मुळ रा. उत्तरप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

गोव्याहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या महिंद्रा मोटारीमधून (एम एच 07 एबी 2663) गोवा बनावट दारूची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिस नाईक पांडुरंग पांढरे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वाहतुक शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक एस. बी. मुल्ला यांना दिली. त्यानंतर पोलिस वाहनचालक व्ही. एस. सावळ आणि श्री. पांढरे यांनी वागदे येथे सापळा रचला. दोन साक्षिदारांना सोबत घेवून अलिशान मोटार अडविली.

यावेळी मोटारीत एका लाख 68 हजार रूपयेची हनीगाईड आणि 7200 रूपयेचे किंगफिशरच बिअरचे 48 बॉक्‍स तसेच 8 लाख 25 हजारची महिंद्रा मोटार ताब्यात घेण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी महामार्गावर जिल्हा पोलिस वाहतुक शाखेने ही कारवाई केली आहे. 

Web Title: Sindhudurg News liqueur seized in Kankavali