माधव भांडारींचे अखेर "राजकीय पुनर्वसन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

देवगड - भाजपमधील अभ्यासू व्यक्‍तिमत्व आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्‍ते म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यातील माधव भांडारी यांची राज्याच्या पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन पुनःस्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. कधीकाळी आमदारकीचे उमेदवार अशी ओळख असलेल्या भांडारीचे अखेर राजकीय पुनर्वसन झाले.

देवगड - भाजपमधील अभ्यासू व्यक्‍तिमत्व आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्‍ते म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यातील माधव भांडारी यांची राज्याच्या पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन पुनःस्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. कधीकाळी आमदारकीचे उमेदवार अशी ओळख असलेल्या भांडारीचे अखेर राजकीय पुनर्वसन झाले.

मुळ कुणकेश्‍वरचे आणि काही काळ जामसंडे येथे वास्तव्यास राहिलेल्या श्री. भांडारी यांची राजकारण, सहकार याबरोबरच पत्रकारीता क्षेत्रात विशेष ओळख आहे. विविध विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची काही पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. तत्कालिन स्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्यासोबत काम करताना जिल्ह्यात भाजपच्या पायाभरणीच्या काळात त्यांच्यावर संघटनपदाची जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे भाजपच्या जडणघडीमध्ये त्यांचे सुरूवातीपासूनच योगदान राहिले.

साप्ताहिक "अणूरेणू' च्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळताना पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी ठसा निर्माण केला. तालुक्‍यातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना संस्थेचा चढता आलेख ठेवला. सहकार क्षेत्रात ओळख असलेल्या देवगड अर्बन को-ऑप बॅंकेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी सांभाळले.

युतीच्या काळात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तर काही काळ काळासाठी प्रभारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली. आपल्या अभ्यासू नेतृत्व गुणामुळे राजकारणातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तत्कालीन देवगड विधानसभा मतदार संघात आमदारकीच्या स्पर्धेत त्यांचे नांव अग्रेसर होते. राजकीय साठमारीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नसली तरी पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याने पक्षाने त्यांच्यावर प्रदेश प्रवक्‍ते पदाची जबाबदारी सोपवली. या पदावर काम करताना त्यांच्या संयमी, परखड, सडेतोड आणि अभ्यासू वृत्तीचे राज्याला अनेकदा दर्शन घडले. आता पक्षाने त्यांची पुर्नवसन पुनःस्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. उशिरा का होईना पण पक्षाकडून एका अभ्यासू व्यक्‍तीमत्वाच्या नेतृत्वगुणाची पारख झाली असेच म्हणावे लागेल.

Web Title: Sindhudurg News Madhav Bhandari as Minister