मनसेच्या कॅरम आंदोलनाने कुडाळ महावितरणला जाग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

वीज वितरण कंपनीकडे कुडाळ तालुक्‍यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी रक्कम भरली होती; मात्र या शेतकऱ्यांना काही वर्षे शेतीपंप मिळाला नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आज मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विभाग अध्यक्ष दिपक गावडे यांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराओ घालण्याचा निर्णय घेतला.

कुडाळ  -  मनसेचे पदाधिकारी कॅरम खेळण्यासाठी अधिक्षक अभियंतांच्या कार्यालयात जाणार तोपर्यंत कृषीपंपाचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला. मनसेच्या या अभिनव आंदोलनाला यश आले. 

वीज वितरण कंपनीकडे कुडाळ तालुक्‍यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी रक्कम भरली होती; मात्र या शेतकऱ्यांना काही वर्षे शेतीपंप मिळाला नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आज मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विभाग अध्यक्ष दिपक गावडे यांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराओ घालण्याचा निर्णय घेतला. वीज वितरणकडून होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत अधिक्षक अभियंता यांच्या दालनात कॅरम खेण्यासाठी पदाधिकारी सज्ज झाले.

संबंधीत ठेकेदाराला याबाबत समजताच त्यांनी घटनास्थळी जावून वीज जोडणी कामाला सुरूवात केली. तत्काळ कामाला सुरूवात केली नसती तर सर्व पदाधिकारी कॅरम खेळण्याचे अनोखे आंदोलन करणार होते. या प्रश्‍नासह पिंगुळी गावात वायरमनबाबत समस्या तसेच विजेचा लपंडाव याबाबत अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्याशी चर्चा केली. बाळा पावसकर, जगन्नाथ गावडे, अमर अणसूरकर, कुणाल किंजवडेकर, सिद्धेश गावडे, प्रथमेश धुरी उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News Manase Caram agitation in Kudal