#MonsoonTourism करूळ, भुईबावडा घाटातील धबधबे प्रवाहित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

वैभववाडी - नागमोडी वळणावर फेसाळणारे धबधबे, हिरवागार गालिछाने पांघरेलेले डोंगर, माथ्यावर किल्ले गगनगड, हजारो फुट दरीतुन येणारे दाट धुके यामुळे करूळ आणि भुईबावडा घाटांमध्ये नैसर्गिक पर्यटनाला मोठी संधी आहे; परंतु पायाभुत सुविधांचा अभाव आणि राजकीय व प्रशासकीय अनास्थामुळे या दोन्ही घाटातील नैसर्गिक पर्यटन झाकोळले गेले आहे.

वैभववाडी - नागमोडी वळणावर फेसाळणारे धबधबे, हिरवागार गालिछाने पांघरेलेले डोंगर, माथ्यावर किल्ले गगनगड, हजारो फुट दरीतुन येणारे दाट धुके यामुळे करूळ आणि भुईबावडा घाटांमध्ये नैसर्गिक पर्यटनाला मोठी संधी आहे; परंतु पायाभुत सुविधांचा अभाव आणि राजकीय व प्रशासकीय अनास्थामुळे या दोन्ही घाटातील नैसर्गिक पर्यटन झाकोळले गेले आहे.

पावसाळा सुरू झाला की वर्षा पर्यटनाला सुरूवात होते. आंबोली हे वर्षा पर्यटनाकरीता प्रसिध्द आहे; परंतु आंबोलीप्रमाणे वैभववाडी तालुक्‍यातील करूळ आणि भुईबावडा घाटात नैसर्गिक पर्यटनाला मोठी संधी आहे. 

  •  करूळ घाटात प्रवाहीत झालेले धबधबे - ५
  •  भुईबावडा घाटात प्रवाहीत झालेले धबधबे -२
  •  करूळ घाटातील पिकनिक पाँईट- ३
  •  भुईबावडा- १

या दोन्ही घाटांची रचना अतिशय मोहक आहे. हजारो फुट उंच असलेल्या या घाटातून कोकणच विहंगम दृश्‍य न्याहळताना पर्यटकांच्या डोळ्यांचे अक्षरक्षः पारणे फिटते. पावसाळा सुरू झाल्यानंतर या दोन्ही घाटांचा परिसर हिरवागार होतो. खोल दरीतून धुक्‍यांच्या लहरी सतत रस्त्याकडे धावताना दिसतात. 
करूळ घाटात एकुण पाच धबधबे आहेत. भुईबावडा घाटात दोन धबधबे आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे सर्व धबधबे प्रवाहीत झाले आहेत. करूळ घाटात तीन पिकनिक पाँईट आहेत तर भुईबावडा घाटात दोन धबधबे आहेत.

करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांमध्ये नैसर्गीक पर्यटनाला मोठी संधी आहे; मात्र अपेक्षेप्रमाणे येथील पर्यटन बहरले नाही. पायाभुत सुविधांचा अभाव आणि राजकीय अनास्था यामुळे घाटातील पर्यटनाकडे दुर्लक्ष झाले. येथील धबधब्यावर मोठया प्रमाणात पर्यटक येतात; परंतु सुविधांअभावी पर्यटक स्थिरावत नाही. त्यामुळे घाटपर्यटनाला बळ मिळण्यासाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

धबधबा परिसर विकसित करण्याची गरज
करूळ, भुईबावडा घाटातील वातावरण महाबळेश्‍वरप्रमाणे असते. करूळ घाटात पाच तर भुईबावडा घाटात दोन धबधबे आहेत. या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात; मात्र धबधबा परिसराचा कोणताच विकास न झाल्यामुळे पर्यटक नाराज होतात. त्यामुळे धबधबा परिसर विकसित करण्याची गरज आहे.

Web Title: Sindhudurg News Monsoon Tourisum karul, Bhibawada waterfall