मोर्ले - पारगड रस्त्यासाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सावंतवाडी - मोर्ले पारगड रस्त्याचे उर्वरीत काम करण्यास प्रशासनाकडून दिरंगाईचे धोरण सुरू आहे, असा आरोप करीत गावातील ग्रामस्थांनी आज येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण केले.

सावंतवाडी - मोर्ले पारगड रस्त्याचे उर्वरीत काम करण्यास प्रशासनाकडून दिरंगाईचे धोरण सुरू आहे, असा आरोप करीत गावातील ग्रामस्थांनी आज येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण केले.

यावेळी रस्त्यासाठी बाधीत होण्याच्या जमिनी व घरांचे मुल्यमापन तात्काळ करण्यात यावे तसेच रेंगाळलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
मोर्ले पारगड (ता. दोडामार्ग) या रस्त्याचे काम गेले अनेक दिवस रेंगाळलेले आहे. वनविभागाच्या जमिनीचा तिढा सुटल्यानंतर हे काम सुरू झाले होते; परंतु आता नवाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बांधकाम विभागाकडुन रस्त्यासाठी बाधीत होणाऱ्या घरे आणि जमिनीचे मुल्यमापन करण्यात आलेले नाही. त्यामुळे उर्वरीत रस्त्याचे काम रेंगाळले आहे. परिणामी काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्यामुळे हे काम पुन्हा रेंगाळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी घेवून ग्रामस्थांनी आज येथील बांधकाम कार्यालयासमोर सरपंच महादेव गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले.

यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर राजू मसुरकर, रविंद्र म्हापसेकर यांनी उपोषणस्थळी भेट देवून त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. 
 

Web Title: Sindhudurg News Morle-Pargad Road issue