मुलानेच लाकडी दांडा मारून केला आईचा खून

अमोल टेंबकर
शुक्रवार, 30 मार्च 2018

कुडाळ - आई व्यवस्थित जेवण करत नसल्याच्या रागातून मुलानेच लाकडी दांडा मारून आईचा खून केल्याचा प्रकार आकेरी गावडेवाडी येथे घडला.

कुडाळ - आई व्यवस्थित जेवण करत नसल्याच्या रागातून मुलानेच लाकडी दांडा मारून आईचा खून केल्याचा प्रकार आकेरी गावडेवाडी येथे घडला.

ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास आकेरी गावडेवाडी येथे घडली. मनीषा चंद्रकांत चव्हाण (60) असे मृत आईचे नाव आहे. खुनाची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश भोसले, त्यांचे सहकारी श्री खरात श्री पाटील श्री गवस आदी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मुलगा अनंत चंद्रकांत चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबतची माहिती कुडाळ पोलिस ठाण्याचे अमंलदार सुनिल पडवळ यांनी दिली.

 

Web Title: Sindhudurg News Mothers Murder by son