मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात बस स्टॉप गायब

राजेश सरकारे
गुरुवार, 7 जून 2018

कणकवली - मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरणात अनेक घरासह बस थांबे देखील जमिनदोस्त करण्यात आले आहेत. चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर झाराप ते खारेपाटण या दरम्यान एकूण नवीन 28 बसथांबे आणि महामार्ग दुतर्फा 56 पिकअप शेड बांधली जाणार आहेत. तोपर्यंत प्रवाशांना बस पकडण्यासाठी ऊन, पावसातच थांबावे लागणार आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल तेव्हा होईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात तरी बस थांबे अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एस.टी. महामंडळाने ठिकठिकाणी मार्ग निवारे उभे केले होते. चौपदरीकरणाच्या रस्ता रुंदीकरणात हे बस थांबे हटविले जात आहेत. खारेपाटण ते झाराप या दरम्यान 16 बस थांबे अधिकृत आहेत. तर स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार 30 ठिकाणी विनंती थांबे देण्यात आहेत. महामार्ग चौपदरीकरणात खारेपाटण ते झाराप या दरम्यान 28 बस थांब्यांना मंजूरी देण्यात आली आहे. महामार्ग दुतर्फा 28 ठिकाणी हे थांबे असल्याने महामार्गाच्या उजवीकडे आणि डावीकडे मिळून 56 पिकअप शेड बांधली जाणार आहेत.

डिसेंबर 2018 पर्यंत झाराप ते खारेपाटण या हद्दीतील चौपदरीकरण पूर्ण करण्याचे नियोजन ठेकेदार कंपन्यांनी केले आहे. हे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर महामार्ग दुतर्फा नवीन 56 बस थांब्याची उभारणी होणार आहे.

28 ठिकाणी होणार नवीन बसथांबे
खारेपाटण, नांदगाव, ओसरगांव, कसाल, बिबवणे, कुडाळ आणि झाराप गावांत प्रत्येकी 2 तर नडगिवे, वारगाव, तळेरे, कासार्डे, वागदे सिंधुदुर्गनगरी, हुमरमळा, वेताळबांबार्डे, पावशी, हुंबरट, तेर्सेबांबार्डे या गावात प्रत्येकी एक बस थांबा असणार आहे. कणकवली शहरात तीन बस थांबे असणार आहेत. हे सर्व बस थांबे महामार्गाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणार आहेत. तसेच सर्व बस थांब्याच्या ठिकाणी सर्व्हिस रोड ठेवण्यात आले आहेत.

सध्याच्या चौपदरीकरणाची गती पाहता, महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्यास आणखी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत प्रवाशांना ऊन, पावसातच ताटकळत राहावे लागणार आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीने तात्पुरते निवारा शेड उभी करायला हवीत.
- मोहन केळुसकर,
अध्यक्ष कोकण विकास आघाडी

Web Title: Sindhudurg News Mumbai-Goa Highway four track issue