मुंबई - गोवा चौपदरीकरण बाधितांचे 264 कोटी रखडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

कणकवली - सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांना अद्याप 264 कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वितरण झालेले नाही. त्यामुळे कणकवली, वागदे आणि कुडाळ येथील चौपदरीकरणाचे काम ठप्प असल्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोबदला वितरणाची कार्यवाही सुरू आहे; मात्र अनेक प्रकल्पग्रस्तांनी आवश्‍यक ते पुरावे न दिल्याने 264 कोटींचा मोबदला वितरण झालेला नाही. त्याबाबत युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली.

  • महामार्ग चौपदरीकरणात कुडाळ मधील 18 तर कणकवली मधील 22 गावांचा समावेश
  • कुडाळ तालुक्‍यात 388.68 कोटींपैकी 298.88 कोटींचे वाटप
  • कणकवली तालुक्‍यात 491 कोटींपैकी 370 कोटी रक्कम वाटप 

मुंबई गोवा महामार्गासाठी कणकवली आणि कुडाळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. मात्र विविध कारणास्तव कणकवली तालुक्‍यात 140 कोटी तर कुडाळ तालुक्‍यात 124 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप प्रकल्पग्रस्तांना झालेली नाही. ही रक्‍कम प्रकल्पग्रस्तांना अदा करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली असा प्रश्‍न आमदार नाईक यांनी विधीमंडळात उपस्थित केला होता.

श्री. नाईक यांच्या प्रश्‍नाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात संबंधित खातेदारांना वाटप करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नोटिसा स्वीकारल्या आहेत. पण पुरावे जमा न केल्याने भरपाई वाटप थांबले आहे. काही खातेदार कायमस्वरूपी बाहेरगावी आहेत. तसेच काही मयत खातेदारांची वारस कार्यवाही अपूर्ण राहिली आहे.

याखेरीज काही प्रकल्पग्रस्तांनी बॅंक खाते तपशील सादर न केल्याने भरपाई वितरण झालेली नाही. तरीही उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर मोबदला वाटपाची किती रक्कम शिल्लक आहे. तसेच भूसंपादन व मोबदला वाटपाच्या प्रगतीबाबतचा आढावा शासन स्तरावरून घेण्यात येत असल्याचीही माहिती श्री.पाटील यांनी दिली.

Web Title: Sindhudurg News Mumbai-Goa Highway four track issue