सावंतवाडीत मटण मार्केटच्या रंगकामावरून वादाची शक्यता

अमोल टेंबकर
बुधवार, 7 मार्च 2018

सावंतवाडी - स्वच्छता अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर एकदा मटणमार्केटचे रंगकाम करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा रंगकामाबाबत निविदा काढण्यात आलेली आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील भरवस्तीत असलेल्या या मटण मार्केटचे दोनदा रंगकाम कशासाठी अशा सवाल विचारला जात आहे. मटण मार्केट अन्यत्र हलविण्याचे नियोजन असताना पुन्हा रंगकाम कशासाठी यावरून पुन्हा वादाची शक्यता निर्माण झाली आहे. 

सावंतवाडी - स्वच्छता अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर एकदा मटणमार्केटचे रंगकाम करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा रंगकामाबाबत निविदा काढण्यात आलेली आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील भरवस्तीत असलेल्या या मटण मार्केटचे दोनदा रंगकाम कशासाठी अशा सवाल विचारला जात आहे. मटण मार्केट अन्यत्र हलविण्याचे नियोजन असताना पुन्हा रंगकाम कशासाठी यावरून पुन्हा वादाची शक्यता निर्माण झाली आहे. 

नागरिकांचा विरोध लक्षात घेता, हे मार्केट बंद करुन बाहेरचावाडा येथील आरक्षित जागेत नेण्याचे पालिकेचे नियोजन आहे, असे असताना त्या ठिकाणी केवळ रंगकामासाठी चाळीस हजाराचा खर्च का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी,  अशी मागणी गोकुळदास शिरसाट व अन्य नागरिकांनी केली आहे. 

याबाबत त्यांनी सकाळशी संपर्क साधून पालिकेतून देण्यात आलेल्या लेखी आश्‍वासनाच्या कागदपत्राच्या आधारे हा प्रकार समोर आणला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार उभाबाजार परिसरात भरवस्तीत असलेल्या मटण मार्केटमुळे परिसरातील नागरीकांना त्रास होतो त्यामुळे हे मार्केट अन्यत्र हलविण्यात यावे, अशी मागणी तेथील रहिवाश्यांकडुन करण्यात आली होती. याबाबत आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी येत्या दोन वर्षात हे मटण मार्केट बाहेरचावाडा येथील आरक्षित जागेत हलविण्यात येईल. त्यासाठी खासगी जागा संपादीत करण्यात येणार आहे असे पत्राद्वारे सांगितले होते. या प्रकीयेला आता दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे ,मात्र हे मार्केट अन्य ठिकाणी नेण्यापेक्षा त्या मार्केटचे रंगकाम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, आता हे मार्केट बंद करण्यात येणार आहे, तसा पालिकेचा शब्द आहे. मग त्या इमारतीवर चाळीस हजार रुपये खर्च का केला जात आहे. तसेच चाळीस हजार रुपयाचा रंग त्या ठिकाणी लागणार का ? असा प्रश्‍न करुन स्वच्छता अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर हे मार्केट रंगविले होते. मग पुन्हा खर्च का ? असा प्रश्‍नही श्री शिरसाट यांनी केला आहे. या सर्व प्रकाराच्या चौकशीची मागणी आपण करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

नेवगी, सुकींची भूमिका काय ? 
शिरसाट म्हणाले हे मटण मार्केट हलविण्यात यावे, अशी  उभाबाजार वैश्यवाडा पांजरवाड्यातील नागरीकांची मागणी होती. त्यावेळी विद्यमान नगरसेवक शुभांगी सुकी आणि आनंद नेवगी हे दोघे ही त्याच मागणीवर अडून होते. त्यामुळे आता याबाबत त्या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे शिरसाट यांनी सांगितले

Web Title: Sindhudurg News Mutton Market issue in Sawantwadi