चिघळणाऱ्या मराठा आंदोलनाला सरकारच जबाबदार - नारायण राणे

तुषार सावंत 
रविवार, 22 जुलै 2018

कणकवली - राज्यभरात मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा बदलली आहे. याला सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सरकारने न्यायालयात अॅफीडेव्हीड दिले असते तर ही परिस्थिती आली नसती. यापुढे चिघळणाऱ्या मराठा आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील असे मत मराठा आरक्षण समितीचे तत्कालीन अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोकणातही मराठा क्रांती मोर्चाच्या बैठका सुरू असून पुढील काळात येथेही आंदोलने होणार आहेत.

या पार्श्‍वभूमीवर खासदार राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ""राज्यात आंदोलन ज्या स्टेजला गेले आहे त्याला कोण जबाबदार आहे. न्यायालयात योग्य वेळी कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. सरकारच्यावतीने शपथपत्र दिले गेले नाही. त्यामुळे आंदोलनाची दिशा, स्वरूप बदललं. जे काही होत आहे त्याला सरकार जबाबदार आहे.

सरकारने ताबडतोब न्यायालयात योग्य ती कागदपत्रे सादर करायला हवीत. सरकारची बाजू स्पष्ट करावी. आरक्षण देण्याबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट करायला हवी. मराठा समाजाने अजूनही बऱ्यापैकी संयम पाळलेला आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करण्याची गरज आहे. एवढे वर्ष मराठा समाज आरक्षण मागत आहे त्याला टोलवाटोलवी का केली जात आहे असा सवाल श्री. राणे यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: sindhudurg news Naraya Rane Press