दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही - नारायण राणे

दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही - नारायण राणे

कुडाळ - मला मंत्रिपद कधी मिळेल हे मुख्यमंत्र्यांना विचारा. मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही. यामुळे मंत्रिमंडळात मी लवकरच दिसेन, असे सांगतानाच आगामी निवडणुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढेल, असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी जाहीर केले.

राणे यांची आज येथे पत्रकार परिषद झाली. कोरेगाव भीमामध्ये जे घडतंय, त्यावर कोणीही नेत्याने भाष्य करू नये. त्यामुळे हा वाद थंड होईल, असेही ते म्हणाले. 

राणे म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्हा विकासाबाबत मागील 3 वर्षांत 10 वर्षं मागे गेल्याची स्थिती आहे. सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा व घोषणांची अंमलबजावणी नाही. रस्ते खड्डेमय झाले आहेत, आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत, महसूल विभाग जनतेचे शोषण करत आहे, भ्रष्टाचार फोफावला आहे. अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. विमानतळ काम संथगतीने सुरू आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. आडाळी एमआयडीसी काम सुरू झालेले नाही. जिल्हा नियोजन कामाला कट बसला आहे. या साऱ्याला घोषणाबाज पालकमंत्री जबाबदार आहेत.'' 

ते म्हणाले, ""पालकमंत्र्यांना अधिकारी ऐकत नाहीत हे दुर्दैव आहे. तीन वर्षांत शून्य काम असणारे निष्क्रिय पालकमंत्री, असे त्यांचे वर्णन करावे लागेल. जिल्हा नियोजनाच्या निधीला सरकारने 40 टक्के लावला कट लावला आहे. पालकमंत्री फक्त घोषणा करताहेत. निधी आणण्याची पालकमंत्र्यांची हिंम्मत नाही. पालकमंत्र्याचे तीन वर्षांतील काम शून्य आहे.'' 

ते म्हणाले, ""स्वाभिमान पक्ष सभासद नोंदणी 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल. राज्यात पक्ष संघटना वाढवत असताना जिल्ह्यातील तीनही विधानसभा जागा व खासदार विजयी करणे हे पक्षाचे प्रमुख लक्ष्य असेल. पडवे येथील हॉस्पिटल लवकरच सुरू करणार आहे. हॉस्पिटलच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागितली आहे.'' 

या वेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, नगराध्यक्ष विनायक राणे, विकास कुडाळकर उपस्थित होते. 

ग्रीन रिफायनरीला विरोध 
कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे राणेंनी स्पष्ट केले. कोकणच्या पर्यावरणाला धोका होत असेल तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com