सिंधुदुर्ग बॅंकेच्या कार्यक्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा बॅंकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले काम आणि बॅंकेची आजवर झालेली प्रगती पाहता जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाचे काम अतिशय कौतुकास्पद असे आहे. तळागाळातील घटकांना ही बॅंक चांगली सेवा देत आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बॅंकेच्या प्रगतीसाठी बॅंकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा, यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या समवेत आवाज उठविला जाईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी जिल्हा बॅंकेच्या नूतन वास्तूच्या उद्‌घाटन प्रसंगी केली. 

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन आणि नाविण्यपूर्ण पाच योजनांचा प्रारंभ खासदार राणे यांच्या हस्ते काल (ता.1) झाला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार नितेश राणे, आमदार सतेज पाटील, बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद चे सर्व सभापती, बॅंकेचे अधिकारी संचालक उपस्थित होते. 

राणे म्हणाले,""सिंधुदुर्ग जिल्हा छोटा असूनही या बॅंकेने चांगल्या प्रामाणिक सेवेमुळे राज्यात आपले नाव कमावले आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालकांनी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदर्शवत असे काम करून हे यश मिळविले आहे.'' 

आमदार नितेश राणे म्हणाले,""जिल्हा बॅंकेने ज्यांना ज्यांना आधार दिला ते कधीच विसरणार नाहीत. यापुढे युवकांसाठी नव्या योजना बॅंकेने अंमलात आणाव्यात.'' 

आमदार मुश्रीफ म्हणाले,""नवीन योजना राबवून या बॅंकेने अन्य बॅंकांना स्पर्धा निर्माण केली आहे. यातच या बॅंकेची प्रगती दिसून येते.'' 

आमदार पाटील म्हणाले, ""जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे. त्यावेळी शिवरामभाऊ जाधव यांनी पतपुरवठा केला नसता तर डी. वाय. पाटील कारखाना उभा राहिला नसता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे ऋण कधीच फेडता येणार नाही.'' 

सतीश सावंत यांनी बॅंकेच्या माध्यमातून येथील जनतेची सेवा करण्याच्या कार्यात कोठेही खंड पडणार नसल्याची हमी दिली. 

Web Title: Sindhudurg News Narayan Rane comment