राणेंची मकरसंक्रात होणार गोड ?

अमोल टेंबकर
बुधवार, 10 जानेवारी 2018

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मकरसंक्रातीच्या काळात मंत्रीपदाची गोड भेट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत त्याच्या जवळच्या एका जिल्हा पदाधिकाऱ्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मकरसंक्रातीच्या काळात मंत्रीपदाची गोड भेट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत त्याच्या जवळच्या एका जिल्हा पदाधिकाऱ्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

मंत्रीपद मिळणार असल्यामुळे सावंतवाडी येथे जाहीर करण्यात आलेला सुंदरवाडी महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे, असेही या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर प्रवाहात सामील झालेल्या राणेंना भाजपकडुन मंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता, परंतू अनेक वेळा ही तारीख पुढे ढकलली होती. आता मात्र मकरसंक्रातीच्या पाश्र्वभुमीवर राणेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या समर्थकात आनंद व्यक्त होत आहे.

Web Title: Sindhudurg News Narayan Rane political issue