बंदावस्थेत असलेल्या बांदा आरोग्य केंद्राचे निलेश राणेंनी केले उद्घाटन

अमोल टेंबकर
बुधवार, 21 मार्च 2018

सावंतवाडी - प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला अधारात ठेऊन दोन वर्षापासून बदांवस्थेत असलेल्या बांदा प्राथमिक आरोग्य केद्राचे उद्घाटन माजी खासदार डॉ  निलेश राणे यांनी केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

सावंतवाडी - प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला अधारात ठेऊन दोन वर्षापासून बदांवस्थेत असलेल्या बांदा प्राथमिक आरोग्य केद्राचे उद्घाटन माजी खासदार डॉ  निलेश राणे यांनी केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. दोन वर्षे बंदावस्थेत असलेले रुग्णालय सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांनी यावेळी जल्लोष साजरा केला

जिल्हा नियोजनच्या निधीतून बांदा येथे असलेली प्राथमिक आरोग्य केद्राची इमारती नव्याने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  त्यासाठी 2013 मध्ये पावणे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 2016 मध्ये या इमारतीचे काम पुर्ण झाले होते . मात्र लाईटची व्यवस्था नाही, असे कारण पुढे करुन ही इमारत बंदावस्थेत ठेवण्यात आली होती. परिणामी माकडताप साथरोगाच्या काळात रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांना अन्य ठिकाणच्या जागेत रहावे लागत होते, तसेच नवी इमारत असुन सुध्दा वैदयकीय अधिकार्‍यांना जीर्ण खोल्यात बसावे लागत होते. 

ग्रामीण भागातील लोकांच्या सोईसाठी आम्ही पुढाकार घेवून हे रुग्णालय खूले केले आहे. त्यामुळे ते कोणाच्या राजकीय दबावापोटी पुन्हा बंद होणार नाही, याची काळजी येथील ग्रामस्थांनी घ्यावी. आवश्यक असलेला औषध पुरवठा आमच्या पक्षाकडुन केला जाणार आहे. कोणाची गय केली जाणार नाही. 

- निलेश राणे, माजी खासदार 

दरम्यान याबाबतची माहीती माजी खासदार राणे यांना मिळाल्यानंतर प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता स्वाभिमान पक्षाच्यावतीने या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार श्री राणे हे सावंतवाडीत आले तेथील एका हॉटेलमध्ये आपल्या कार्यकर्त्याना एकत्र करुन थेट जावून उद्घाटनाचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी आतील खोल्या तसेच सुखसोईची पाहणी केली.  

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खूद्द श्री राणे यांनी याबाबतची माहीती दिली ते म्हणाले केवळ पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे काम पुर्ण होवून दोन वर्षे झाल्यानंतर सुध्दा इमारत सुरू झाली नाही. परिणामी त्या ठिकाणी येणार्‍या रुग्णांना अन्य ठिकाणाचा आसरा घ्यावा लागत आहे. माकडताप तसेच साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांकडुन तसेच आरोग्य मंत्र्याकडून अशा प्रकारे वेळ काढू भूमीका घेणे चुकीचे आहे. तब्बल तीन वेळा इमारतीचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. मात्र दौरा रद्द झाल्यामुळे ते होवू शकले नाही. त्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत होता. त्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतला. अशी माहिती राणेंनी दिली. 

यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राउळ, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर उपसभापती निकीता सावंत, माजी आरोग्य सभापती प्रमोद कामत, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, ज्ञानेश्‍वर सावंत, राखी कळंगुटकर, बांदा उपसरपंच अक्रम खान, गुरू सावंत, गुरू मठकर, विशाल परब, चित्रा भिसे, शामकांत मांजरेकर, अंकीता देसाई, रेश्मा राजगुरू, अरुण देसाई, एच एस खान, प्राथमिक आरोग्य केद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ जगदिश पाटील आदी उपस्थित होते

Web Title: Sindhudurg News Nilesh Rane Press