राणेंना विधानसभेतच पाहायचंय! - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

कणकवली - नारायण राणे यांच्यासारखा नेता आम्हाला विधानसभेतच पाहायचा आहे. राज्यसभेत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांचे पुत्र व आमदार नीतेश राणे यांनी  िट्‌वट केले. त्यांनी या भूमिकेचे समर्थन करताना आम्ही सुचवू शकतो; मात्र अंतिम निर्णय राणेंचाच असेल, असेही स्पष्ट केले. 

कणकवली - नारायण राणे यांच्यासारखा नेता आम्हाला विधानसभेतच पाहायचा आहे. राज्यसभेत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांचे पुत्र व आमदार नीतेश राणे यांनी  िट्‌वट केले. त्यांनी या भूमिकेचे समर्थन करताना आम्ही सुचवू शकतो; मात्र अंतिम निर्णय राणेंचाच असेल, असेही स्पष्ट केले. 

श्री. राणे यांचा नुकताच दिल्ली दौरा झाला. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली. त्यांना राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली गेल्याची चर्चा गेले दोन दिवस प्रसारमाध्यमांमध्ये आहे. यावर त्यांचे पुत्र व काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी ट्‌विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. राणेंची महाराष्ट्राच्या राजकारणात गरज आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेतच राहावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, अशा आशयाचे हे ट्‌विट आहे. 

याबाबत आमदार राणे म्हणाले, ‘‘असंख्य राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या भावना यातून मी मांडल्या आहेत. या भावना राणेंसमोर आणि महाराष्ट्रासमोर मांडल्या आहेत. गेले दोन दिवस राणेंना राज्यसभेची ऑफर असल्याची व ते त्यावर विचार करत असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे. यामुळे राणेंच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याशी संपर्क साधला जात आहे. ते सर्वजण आज महाराष्ट्राला राणेंसारख्या नेत्याची गरज आहे. त्यांना विधानसभेतच बघायचे आहे, राज्यसभेत नाही, अशा भावना ते व्यक्‍त करत आहेत. याच भावना यातून मांडल्या आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘अंतिम निर्णय राणेंचा असणार आहे. आमच्यावर काय जबाबदारी टाकायची, हेही तेच ठरवणार आहेत. मी यातून केवळ कार्यकर्त्यांची भावना व्यक्‍य केली आहे. आमची आशा आहे की, ते आमचे ऐकतील. आम्ही केवळ आशा व्यक्‍त करू शकतो. अर्थात अंतिम निर्णय त्यांचा असेल.’’

Web Title: Sindhudurg News Nitesh Rane Comment