उर्दू हायस्कूलमध्ये आठवीचा वर्ग आठ महिने शिक्षकाविना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

सावंतवाडी - दहावीच्या वर्गाला तब्बल आठ महिने इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने येथील उर्दू हायस्कूलमध्ये पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. तत्काळ शिक्षक भरण्यात यावा तसेच शौचालयाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी आज शाळा बंद पाडत संस्था अध्यक्षांना घेराओ घातला.

याबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे संतप्त पालकांनी स्थानिक अध्यक्षांचा राजीनामा घेतला. पालकांची मागणी लक्षात घेऊन तत्काळ योग्य तो निर्णय घ्या; अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा पालकांकडून देण्यात आला.

शिक्षकासाठी प्रयत्न सुरूच...
याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘येत्या आठ दिवसांत शौचालय बांधण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी एका संचालकाकडे देण्यात आली आहे. रिक्त पद भरण्यासाठी दोन वेळा जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एक शिक्षिका आली होती; मात्र अर्ध्यावरच काम सोडून ती निघून गेली. त्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला. यावर लवकरात लवकर शिक्षक नेमण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.’’

मर्कजी जमात, मुंबई या संस्थेच्या वतीने येथील बाहेरचावाडा भागात चालविणाऱ्या जाणाऱ्या उर्दू हायस्कूल मध्ये गेले आठ महिने दहावीच्या वर्गाला इंग्रजीचा शिक्षक नाही. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक आहेत, असे असताना अद्याप शिक्षक भरला न गेल्याने पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्याचबरोबर प्रशालेत मुलींसाठी असलेल्या शौचालयांची दुरावस्था झाली आहे. त्याला दरवाजे नाहीत. गवत वाढले आहे. अशा अवस्थेत त्याचा वापर केला जात आहे. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे संस्थेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे याबाबत काल (ता. ८) पालकांच्या वतीने जाब विचारला होता.

शाळेच्या मैदानात पालक जमले. त्यांनी अध्यक्ष अब्दुल शेख यांना तेथे बोलाविले व घेराओ घातला. जोपर्यंत पालकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा दिला; मात्र शेख यांनी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मुंबई येथे आहेत. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा राजीनामा मागण्यात आला. तत्काळ याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा; अन्यथा पालक पुन्हा आंदोलन करतील, असा इशारा यावेळी पालकांच्यावतीने देण्यात आला.

यावेळी शब्बीर मणियार, खलील खान, जुबेरा खान, नासिर खान, लियाकत शेख, मुहम्मद मुश्‍ताकीन गाईन, इम्रान शेख, अब्दुल शेख, रझिया शहा, रेश्‍मा बागवान, रियाना पटेल, रेहान ख्वाजा, मिनाज शेख, सरातुल्ल खान, शबाना शेख आदी उपस्थित होते.

शिक्षक देण्याची तयारी... 
या आंदोलनाबाबत सेंट्रल इंिग्लश स्कूलचे अध्यक्ष इम्तियाज खानापुरी यांनी नाराजी व्यक्त केली. दहावीच्या वर्षी मुलांना आठ महिने शिक्षक मिळत नाही, हे योग्य नाही. त्यामुळे वादाला बाजूला सारून आम्ही शिक्षक आणि शौचालय दुरुस्तीची तयारी दर्शविली होती; मात्र त्या संस्थेकडून त्यालाही नकार देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News No Teacher in Urdu School issue