सावंतवाडीत साडेतीन लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सावंतवाडी -  शहरातील प्रथितयश सुवर्णकाराला अज्ञाताकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून साडेतीन लाखांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला. हा प्रकार गेले दोन ते तीन महिने सुरू आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी - एका सुवर्णकाराने आपल्या व्यावसायिक वापरासाठी क्रेडिट कार्ड काढले होते. त्याचा ते कधी तरी वापर करायचे; मात्र गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या कार्डवरून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा संदेश त्यांना आला. 

आपण कोणालाच क्रेडिट कार्डने पैसे दिले नसताना अचानक खात्यातील बॅलन्स कमी झाल्याने याबाबत त्यांनी बॅंकेत खात्री केली. यावेळी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या क्रेडिट खात्यातील रक्कम वळती करून घेण्यात आल्याचे बॅंकेतून सांगण्यात आले. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक सुनील धनावडे म्हणाले, ""गेल्या दोन महिन्यांत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून झालेल्या बॅंकिंग व्यवहारांच्या माध्यमातून अधिक तपास करण्यात येणार आहे. संबंधितांकडून ऑनलाईन व्यवहार करण्यात आला असून अज्ञात चोरट्याने नेमके कशासाठी पैसे वापरले, याची माहिती घेण्यात येणार आहे.'' 

Web Title: sindhudurg news Online cheating