आचरा येथे सापडले दुर्मिळ खवले मांजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

आचरा - पिरावाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत दुर्मिळ खवले मांजर स्थानिकांना मंगळवारी (ता. १२) सापडले. जाळयात अडकलेल्या खवले मांजराला सोडवून वन विभागाच्याअधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावर वैद्यकिय उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात आले.

पिरावाडी येथील अजय कोयंडे यांच्या घरालगतच्या कुंपणास असलेल्या जाळयात खवले मांजर अडकलेल्या स्थितीत सापडले. त्यांना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खवले अडकलेल्या स्थितीत दिसले असता त्यांनी याची कल्पना वनविभाग व आचरा पोलिस पाटिल जगन्नाथ जोशी यांना दिली दिली.  श्री. जोशी, माजी सरपंच प्रमोद कोळंबकर व वनविभागाच्या अधिकरी यांनी जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला सोडवत जीवदान दिले.

Web Title: Sindhudurg News pangolin found in Achara