शासकीय डेअरी बुडविणाऱ्यांनी आता शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत - उपरकर 

राजेश सरकारे 
मंगळवार, 19 जून 2018

कणकवली - खासदार नारायण राणे आणि जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शासकीय दूध डेअरी बंद पाडली आणि गोकूळ दूध संघाला जिल्हा आंदण दिला. आता गोकुळने दूध संकलन बंद केल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासकीय डेअरी बुडविणाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करून दाखवावीत, असे आव्हान मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिले.

येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर आदी उपस्थित होते.

श्री.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गातील शासकीय दूध डेअरी दिवसातून दोनदा शेतकऱ्यांचे दूध संकलन करीत होती. तसेच दूध शीतकरणासाठी शेतकऱ्यांना बर्फ देखील पुरवला जात होता. पण नारायण राणे पालकमंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्गात गोकूळ दुधाचे संकलन सुरू केले. तर जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी गोकुळच्या माध्यमातून सिंधुदुर्गात दुग्धक्रांती होणार असा नारा देत शेतकऱ्यांना कर्जे दिली. यात शासकीय दूध डेअरी बंद पाडली. आता गोकूळ दूध संघाने जिल्ह्यातील गायीच्या दुधाचे संकलन बंद केले आहे. यात जिल्ह्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यानंतर आता जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी गोकूळ विरोधात गळे काढत आहेत. पण शासकीय डेअरी बंद करून गोकूळ आणण्याचे पातक त्यांचेच आहे असे श्री.उपरकर म्हणाले.

आता शासकीय दूध डेअरीचे महत्व पटतेय - उपरकर
आज शासकीय दूध डेअरी सुरू असती तर दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना सक्षम पर्याय उपलब्ध राहिला असता. तसा पर्याय रत्नागिरी जिल्ह्यात आहे. शासकीय डेअरी वाचविण्यासाठी आम्ही आंदोलने केली. पण राणे आणि राजन तेली, सुदन बांदिवडेकर, सतीश सावंत यांना शासकीय डेअरी ऐवजी गोकूळ दूध संघातच अधिक स्वारस्य होते असे श्री.उपरकर म्हणाले.

Web Title: Sindhudurg News Parshuram Uparkar Press