सिंधुदुर्गात पासपोर्ट केंद्र दीड महिन्यात कार्यान्वित - ज्ञानेश्‍वर मुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

सावंतवाडी - जिल्ह्यातील पासपोर्ट सेवा केंद्र येत्या दीड महिन्यात कार्यन्वित होणार आहे. त्यामुळे आता पासपोर्टच्या कामासाठी मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत. याबाबतची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी जाहीर केली आहे. 

सावंतवाडी - जिल्ह्यातील पासपोर्ट सेवा केंद्र येत्या दीड महिन्यात कार्यन्वित होणार आहे. त्यामुळे आता पासपोर्टच्या कामासाठी मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत. याबाबतची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी जाहीर केली आहे. 

येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात 13 नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग येथील सेवा केंद्राचाही समावेश देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पासपोर्ट आपल्या दारी या तत्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी 2017 मध्ये देशभरात 251 पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात 7 तर देशभरात 173 पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असून दुसऱ्या टप्प्या अखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात 13 केंद्रांसह देशभरात 251 पासपोर्ट सेवा केंद्रांचे उदिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. 

"पासपोर्ट आपल्या दारी' कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या दीड महिन्यात ही केंद्रे सुरु होणार आहेत. सिंधुदुर्ग, लातूर, अहमदनगर, पंढरपूर सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई, डोंबिंवली, पनवेल, नांदेड आणि जळगाव यांचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी 2017 पासून सुरु झालेल्या देशव्यापी कार्यक्रमानुसार एप्रिल 2018 अखेर पर्यंत दोन टप्प्यात एकूण 251 पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. देशात दर 50 कि. मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून 2018-19 या वित्तीय वर्षात पासपोर्ट तुमच्या दारी' या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उर्वरित ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली. पासपोर्ट विस्ताराच्या या कार्यक्रमामुळे देशातील सर्व सामान्य माणसाला पासपोर्ट मिळणे सहज शक्‍य होणार असल्याचा विश्‍वासही डॉ. मुळे यांनी व्यक्त केली आहे.  

Web Title: Sindhudurg News Passport center in District with in one and half month