पिंगुळी पंचायत समिती पोटनिवडणूकीमध्ये चौरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

कुडाळ - पिंगुळी पंचायत समितीची पोटनिवडणूक चौरंगी होणार आहे. शिवसेना, स्वाभिमान, काँग्रेस, भाजपा या चारही पक्षांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत.

कुडाळ - पिंगुळी पंचायत समितीची पोटनिवडणूक चौरंगी होणार आहे. शिवसेना, स्वाभिमान, काँग्रेस, भाजपा या चारही पक्षांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत.

पिंगुळी पंचायत समितीच्या सौ. संपदा पेडणेकर यांचे अलीकडेच निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. ६ एप्रिलला मतदान होणार आहे. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सौ. निलिमा वालावलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाअध्यक्ष दीपक नारकर, उपसरपंच अजय आकेरकर, पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने तेडोली जिल्हापरिषद सदस्य तथा शिवसेना महिला आघाडी वर्षा कुडाळकर यांची सून शमिका कुडाळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी वर्षा कुडाळकर, संजय पडते, सभापती राजन जाधव, डॉ. सुबोध माधव, मिलिंद परब, महेश पालकर, सिध्दार्थ धुरी, श्रेया परब, अर्चना तायशेटे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने दर्शना वाळके व श्रध्दा पिंगुळकर या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत.

यापैकी एक उमेदवार आपला अर्ज मागे घेण्याची शक्‍यता आहे. तर काँग्रेस मधून स्नेहा पिंगुळकर यांनी अर्ज दाखल केला आहे. चौरंगी लढतीत सेना-भाजप स्वबळावर यावेळी शिवसेना-भाजपाने या पोटनिवडणूकीत युती केलेली नाही. संपदा पेडणेकर या शिवसेनेतून विजयी झाल्या होत्या. त्याचा आपल्या भागात चांगला संपर्क होता. ही जागा ताब्यात आणण्यासाठी शिवसेनेला अन्य पक्षांशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
 

Web Title: Sindhudurg News Pingule panchyat Samitti Election