पोलिस भरती प्रक्रिया सोमवारपर्यंत लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

सिंधुदुर्गनगरी - राज्यभरात एकाचवेळी आज (ता. ७) होणारी पोलिसपदाची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता ही भरती प्रक्रिया सोमवारी (ता. १२) सुरू होणार आहे.

सिंधुदुर्गनगरी - राज्यभरात एकाचवेळी आज (ता. ७) होणारी पोलिसपदाची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता ही भरती प्रक्रिया सोमवारी (ता. १२) सुरू होणार आहे.

शासन निर्देशानुसार संपूर्ण राज्यातील रिक्त पोलिस पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उद्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ७१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी ८१५९ एवढे ऑनलाईन अर्ज आले आहेत.

शासनाने नव्याने प्राप्त झालेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी उद्यापासून सुरू होणारी पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलली असून, आता पोलिस भरती प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी बदललेली तारीख लक्षात घेऊन सोमवारी भरती प्रक्रियेला उपस्थित राहावे. भरती प्रक्रिया पूर्वी निश्‍चित केलेल्या प्रकारेच होणार असून, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.

Web Title: Sindhudurg News Police recruitment process postponed

टॅग्स