पिंगुळीत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

कुडाळ - जमिनीच्या वादातून पिंगुळी गावात आज दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील सहा जण जखमी झाले. ही घटना दुपारी घडली.

कुडाळ - जमिनीच्या वादातून पिंगुळी गावात आज दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील सहा जण जखमी झाले. ही घटना दुपारी घडली.

पिंगुळी गावातील या दोन गटांत गेली दहा वर्षे जमिनीच्या विषयावरून जोरदार वाद आहेत. यापूर्वी पोलिसांपर्यंत हा वादाचा विषय गेला होता. आज या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. 
आज दुपारी दोन्ही गट एकमेकांशी भिडले. या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका गटातील तिघांच्या डोळ्यांना व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच, या हाणामारीत एका गटातील व्यक्तीच्या मोटारसायकलचीही तोडफोड करण्यात आली. याबाबात दोन्ही गटांनी पोलिस ठाण्याकडे रात्री धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल होत जखमींचे जबाब घेतले. याबाबत उशिरापर्यंत तक्रार देण्याची प्रकिया सुरू होती.

Web Title: Sindhudurg News quarrel in Pinguli