सिंधुदुर्गाला पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सिंधुदुर्गनगरी - पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी सिंधुदुर्गाला झोडपून काढले. यामुळे वीज आणि दूरध्वनी सेवा विस्कळित झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच भागांत वाहतूकही विस्कळित झाली.

सिंधुदुर्गनगरी - पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी सिंधुदुर्गाला झोडपून काढले. यामुळे वीज आणि दूरध्वनी सेवा विस्कळित झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच भागांत वाहतूकही विस्कळित झाली.

जिल्ह्यात सोमवारपासून (ता. 29) पूर्वमोसमी पावसाला दमदार सुरवात झाली आहे. आज सकाळी आणि सायंकाळी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. काही भागांत याला वाऱ्याचीही जोड होती. सह्याद्रीच्या भागात पावसाची तीव्रता जास्त होती. यामुळे अनेक भागांत झाडे पडून हानी झाली. काही ठिकाणी रस्त्यात झाडे पडून वाहतूक विस्कळित झाली. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत काल रात्रीपासून वीजपुरवठा खंडित होता. यातच कंत्राटी कामगारांच्या संपामुळे दोष दूर करताना महावितरणच्या नाकीनऊ आले. "बीएसएनएल'ची दूरध्वनी सेवाही अनेक भागांत विस्कळित झाली. इंटरनेट सेवा बंद असल्याने बारावीचा निकाल पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची आज गैरसोय झाली.

दोडामार्ग-बांदा मार्ग ठप्प
दोडामार्ग - तालुक्‍यात वादळीसह वाऱ्याच्या पावसाने मोठे नुकसान झाले. सासोली येथे दोन ठिकाणी झाडे पडून दोडामार्ग-बांदा मार्ग पाऊण तास ठप्प होता. स्थानिक, वाहनचालक, प्रवाशांनी हे झाड तोडून रस्ता मोकळा केला. सायंकाळीही पावसाचा जोर कायम होता. तालुक्‍यात वीज आणि दूरध्वनी सेवा विस्कळित झाली.

Web Title: sindhudurg news rain