दोडामार्गात वादळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

दोडामार्ग - तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण गेले काही दिवस उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. 

पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी गटार तुंबन्याचे प्रकार झाले. तालुक्यातील दूरध्वनी सेवाही ठप्प झाली होती. तसेच काही गावातील वीज पुरवठा खंडित झाला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुमारे पाऊण तास पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांची भंबेरी उडाली.

Web Title: Sindhudurg News Rains in Dodamarg