राजमाता सत्वशीलादेवी भोसले : तेजस्वी पर्वाचा अस्त

भूषण आरोसकर
शुक्रवार, 20 जुलै 2018

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता ह. हा. सत्वशीलादेवी भोसले यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी आपल्या कार्यकालात सावंतवाडी संस्थानमध्ये वेगळी प्रभावशाली ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

‘‘राजमाता या सर्वसामान्यांबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्या होत्या. राजमातांनी हस्त कौशल्याचा सांस्कृतिक वारसा जतन केला. गंजिफाचे स्वतः शिक्षण घेऊन गंजिफाची ओळख जगभर केली. राजमाता स्वतः एक उत्कृष्ट चित्रकार होत्या. त्यांनी बनविलेल्या पेंटिंग्ज उत्कृष्ट नमुना होता. महाविद्यालयावर लक्ष ठेवून मुलांच्या शिक्षणाची काळजी त्या घेत होत्या. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण राजघराण्याच्या दुखःत आपण सहभागी आहोत.’’
- दीपक केसरकर, पालकमंत्री, सिंधुदुर्ग.

‘‘शिवरामराजांचे निधन झाल्यानंतर प्रथा परंपरेला अनुसरून त्यांनी जनतेची चांगल्या प्रकारे सेवा केली आहे. त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सर्व लोकांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे.’’
- शिवराम दळवी, माजी आमदार. 

‘‘राजमाता बडोद्याच्या मोठ्या घराण्यातील आहेत. त्यांनी शिवरामराजे भोसलेंशी विवाह करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिले. शिवरामराजे काँग्रेसचे आमदार होते. राजमाताही त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यात संलग्न होत्या.’’
- विकास सावंत, 
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

‘‘कलेच्या चाहत्यांसाठी व हस्तकौशल्येच्या संस्कृतीची त्यांच्या जाण्यामुळे हानी झाली. जिल्ह्याच्या सौंदर्य कंपनेतेचा ध्यास जपणाऱ्या त्या होत्या. त्यांच्यामुळेच सावंतवाडीतील कलेला प्रेरणा व उर्जितावस्था मिळाली.’’
- डॉ. जी. ए. बुवा.

‘‘जिल्ह्यातील बहुजन समाजासाठी शिक्षणाची सोय करून देण्यात राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचा मोठा वाटा होता. तालुक्‍यात लॉ-कॉलेजची सुविधा त्यांनी मुलांसाठी करून दिली. सावंतवाडीची पेंिटंग्ज, लाकडी खेळणी यांची ओळख करून देण्यासाठी त्यांनी खूप मोठे कष्ट घेतले. 
- ॲड. संदिप निंबाळकर

‘‘राजमाता या कुशल प्रशासक होत्या. कलेच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडी जगासमोर आणली. राज्याभिषेक झालेले शिवरामराजे भोसले हे शेवटचे राजे होते. त्यांच्या निधनामुळे सावंतवाडीला मोठी हानी पोहचली आहे. ऐतिहासिक वारसा हरपला आहे.’’
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी पालिका

‘‘राजमाता शिक्षणप्रेमी, कलाप्रेमी व प्रत्येकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या होत्या. महाविद्यालयावर त्यांचे विशेष प्रेम होते. सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या आत्मास शांती लाभो ही प्रार्थना.’’
- डी. एल. भारमल, प्राचार्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालय

‘‘शिस्तप्रिय, कणखर, कुठल्याही समस्यांना तोंड देणारे असे व्यक्तीमत्व असलेल्या राजमाता सत्वशीलादेवी संस्थानमध्ये आल्यानंतर त्यांनी हस्तकौशल्याला वाव दिला. त्यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी लक्ष दिले.’’
 - ॲड. शामराव सावंत

Web Title: Sindhudurg News Rajmata Satavshiladevi no more