रांगणागडावरील शिवकालीन वाट खुली 

अमोल टेंबकर
मंगळवार, 31 जुलै 2018

सावंतवाडी - पांग्रड येथून रांगणागडावर जाणारी शिवकालीन वाट आता सुकर झाली आहे. गेले अनेक दिवस बंदावस्थेत असलेल्या या पायवाटेला आता एक मिटर रस्त्याचे स्वरुप मिळाले आहे. या वाटेवरुन छत्रपती शिवाजी महाराज रांगणागडावरुन मालवणकडे गेले होते. त्यामुळे या वाटेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आहे. 

सावंतवाडी - पांग्रड येथून रांगणागडावर जाणारी शिवकालीन वाट आता सुकर झाली आहे. गेले अनेक दिवस बंदावस्थेत असलेल्या या पायवाटेला आता एक मिटर रस्त्याचे स्वरुप मिळाले आहे. या वाटेवरुन छत्रपती शिवाजी महाराज रांगणागडावरुन मालवणकडे गेले होते. त्यामुळे या वाटेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आहे. 

येथील वनविभागाच्या माध्यमातून हा रस्ता विकसित केला आहे. त्यासाठी चांदा ते बांदा या योजनेतून दोन लाख वीस हजार रुपये खर्च केला आहे. हा रस्ता खूला झाल्यामुळे आपसूकच पर्यटन वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे, असा दावा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी केला आहे. 

रांगणा गडाला शिवकालीन इतिहास लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज काही दिवस रांगणागडावर थांबले होते. त्यानंतर ते त्याठिकाणावरुन याच पायवाटेने मालवणकडे निघून गेले होते. या गावाच्या खाली त्याठिकाणी रेडेतळ आहे. त्यामुळे त्याठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमी आणि पर्यटकांची संख्या मोठी असते. गेली अनेक वर्षे पांग्रड भागातून गडाच्या दिशेने जाणारा पायवाटेला रस्त्याचे स्वरुप द्यावे, अशी मागणी पर्यटक शिवप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली होती.

त्यानुसार या रस्त्याचा विकास केला आहे; मात्र रस्ता वाढविताना फक्त एक मिटर रुंद केला असून, दगड माती रचून काही ठिकाणी पायऱ्या तर काही ठिकाणी सपाट रस्ता केला आहे. यासाठी समितीचे मंगेश मर्गज, तातु मर्गज, जयसिंग मर्गज, अनिल मर्गज, संकेत घोगळे, गोविंद मर्गज, दत्ताराम मर्गज, संतोष सरंगले, निलेश भणगे, शरद मर्गज, रामदास मेस्द्धी, आनंद मर्गज, राजेश घाडी, बच्चू तेरसे आदींसह वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, वनपाल श्री. चव्हाण, वनरक्षक क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले. 

तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार हा रस्ता विकसित केला आहे. त्यासाठी मी स्वतः चौधरी आणि वनविभागाची टिम घेवून या त्या जंगलमय भागातील ही पायवाट शोधून काढली. त्याचा विकास करण्याचा ठरविले होते. यासाठी पांग्रड वनसमिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहाय्याने आपल्याला हा रस्ता करण्यास यश आले 

- समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक

खोदाईत सापडली महालक्ष्मीची मूर्ती 
या वायवाटेची खोदाई करताना अत्यंत जूनी महालक्ष्मीची मूर्ती सापडली, अशी माहिरी मंगेश मर्गज यांनी दिली. ती मूर्ती शिवकालीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वनविभागाचे अधिकारी चव्हाण यांच्या सुचनेनुसार ती मूर्ती बाजूलाच देव्हारा तयार करून ठेवली आहे. 

Web Title: Sindhudurg News Rangana Fort historic Road open