दुर्मिळ नानेटीची अमेरिकेतील रेफटाईल्स संशोधन पत्रिकेत दखल

अमोल टेंबकर 
सोमवार, 26 मार्च 2018

सावंतवाडी  -  येथील सैनिक वसतिगृहाच्या परिसरात पावसाळ्यात आढळून आलेल्या लाल रंगाच्या नानेटीची दखल अमेरिकेतील रेफटाईल्स अॅन्ड अॅम्फिबियन काॅन्झरव्हेशन फाऊंडेशनने घेतली आहे. हा प्राणी दुर्मिळ असून देशाच्या प्रथमच त्यांची नोंद सावंतवाडीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सावंतवाडी  -  येथील सैनिक वसतिगृहाच्या परिसरात पावसाळ्यात आढळून आलेल्या लाल रंगाच्या नानेटीची दखल अमेरिकेतील रेफटाईल्स अॅन्ड अॅम्फिबियन काॅन्झरव्हेशन फाऊंडेशनने घेतली आहे. हा प्राणी दुर्मिळ असून देशाच्या प्रथमच त्यांची नोंद सावंतवाडीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पालिकेच्या उद्यानाला लागून असलेल्या सैनिक वसतिगृहाच्या परिसरात ही नानेटी आढळून आली होती. येथील बी.एस. बांदेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ललीत घाडी याला ती मिळाली होती. दोडामार्ग शिरंगे येथील असलेला घाडी हा येथील सैनिक वसतिगृहात राहण्यासाठी आहे. त्याला चार एप्रिलला वसतिगृहाच्या परिसरात लाल रंगाची नानेटी आढळून आली होती. त्याने तो साप वनअधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला व या दुर्मिळ जातीवर संशोधन व्हावे, अशी मागणी सावंतवाडी वनविभागाकडे केली होती. 

ठाणे येथील वाईल्ड लाईफ वेलफेअर असोशिएशनचे अनिकेत कदम यांच्याकडे नानेटीवर संशोधन करण्याची मागणी ललीत याने केली होती. त्यानुसार याबाबतची आवश्यक माहिती त्याने अमेरिका येथील नॅशनल रेफटाईल काॅन्झरव्हेशन फाऊंडेशन या संस्थेकडे दिली होती. त्यानुसार त्या संस्थेकडुन याबाबत संशोधन करण्यात आले.  सावंतवाडीत आढळलेली नानेटी ही दुर्मिळ स्वरुपाची असल्याची नोंद त्यांनी त्यांच्या संशोधन पत्रिकेमध्ये केली आहे. 

श्री घाडी म्हणाले संबधित नानेटी वनविभागाच्या ताब्यात दिली होती. मात्र छायाचित्राच्या आधारावर या नानेटीचे संशोधन करण्याची मागणी केली होती. त्यात आम्हाला यश आले आहे. त्या संस्थेने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, देशात प्रथमच अशा प्रकारच्या दुर्मिळ प्रजातीची नोंद झाली आहे. यापुर्वी नानेटीत रंगात साम्य असलेला साप 2011 मध्ये मणीपाल तर 2016 मध्ये कर्नाटकमध्ये आढळून आला होता. मात्र त्याची अधिकृत नोंद कोठे ही नाही. तसेच त्याचे योग्य ते संशोधन झाले त्या ठिकाणावरुन सहाशे किलोमीटर दुर ही नानेटी या ठिकाणी येणे शक्य नाही. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानतर ही नानेटी बाहेर पडते. त्यामुळे याची दुर्मिळ रुप (रेअर माॅर्फ) म्हणून अधिकृत नोंद घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे संशोधन करण्यासाठी घाडी याला येथील श्री पंचम खेमराज विद्यालयाचे प्राध्यापक गणेश मर्गज, बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचे सिध्देश नेरुरकर, ठाणे येथील संस्थेचे अनिकेत कदम, किशोर शिरखांडे यांनी मदत  केली होती. त्यांचाही या प्रबंधात उल्लेख करण्यात आला आहे.

 

Web Title: Sindhudurg News Rare Nanti found in Sawantwadi