कणकवलीतील विकासाचा बॅकलॉग भरणार - रविंद्र चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

कणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. 

कणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. 

शहरातील बाजारपेठ येथील भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्‌घाटन राज्यमंत्री चव्हाण यांनी केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर यांच्यासह राजन वराडकर, अवधूत मालणकर, समृद्धी पारकर, मधुरा पालव, एस.टी.सावंत, रवींद्र शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले,""केंद्रात मोंदी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या यशाचा आलेख चढताच राहिला आहे. ही परंपरा कणकवलीत नगरपंचायतीमध्येही कायम राहणार आहे. राज्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. याखेरीज सर्वाधिक महापौर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष देखील भाजपचेच आहेत. कणकवलीतही भाजपचेच नगरसेवक सर्वाधिक असतील. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. याच दिवशी शहरातील मतदार देखील भाजपला स्थापना दिनाचीही भेट निश्‍चितपणे देतील.'' 

ते म्हणाले, ""गेली अनेक वर्षे संदेश पारकर यांनी शहरात सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची चळवळ अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. पुढील काळात शहरात पारदर्शक कारभार देण्यास पारकरांची टीम सज्ज आहे. भाजप सरकार देखील कणकवली शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहे. सशक्‍त भारतासाठी भाजप सशक्‍त व्हायला हवे.'' 

संदेश पारकर म्हणाले, ""कणकवलीनगरीला उत्तम नागरी सुविधांबरोबरच भ्रष्टाचारमुक्‍त कारभार देण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. भाजपच्या माध्यमातून शहरात कोट्यवधीचा निधी आला. पुढील काळातही शहरविकासासाठी असाच निधी येणार आहे. यातून आम्ही कणकवली हे आदर्श शहर घडविणार आहोत. पुढील दोन दिवसांत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर होणार आहेत.'' 
भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचेही मनोगत झाले. 

Web Title: Sindhudurg News Ravindra Chavan comment