एसटीच्या 442 पदांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

कणकवली - मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एस.टी.च्या रिक्‍त असलेल्या ३ हजार ५४ चालक कम वाहक पदासाठी जून ते सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात सिंधुदुर्गात ४४२ चालक कम वाहक निवडले जाणार आहेत. यात १३४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती एस.टी.च्या मुंबई विभागातून देण्यात आली.

एस. टी. महामंडळात गतवर्षी जुलैमध्ये १४ हजार २४७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. यात कोकणातील ७ हजार ९२३ चालक-वाहक पदासाठी परीक्षा घेतली; मात्र पाच हजारपेक्षा कमी उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे उर्वरित पदे पुन्हा भरण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर २०१८ पर्यंत भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले जात आहे.

एस.टी. महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी चालक कम वाहक अशा पदासाठी भरती प्रक्रिया गतवर्षीपासून सुरू केली आहे. यात कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील चालक कम वाहक पदासाठी यंदा पुन्हा एकदा भरती प्रक्रिया होणार आहे. यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल; तर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे. 

या परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना दोन महिन्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना एस.टी.सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे.

महिला भरतीत अडचणी
मागील वर्षीच्या एस.टी.भरतीमध्ये ४४१ महिला उमेदवारांनी अर्ज केले होते; परंतु एकही महिला उमेदवार पात्र ठरली नाही. चालक कम वाहक भरतीसाठी अवजड वाहतूक परवाना आवश्‍यक ठरतो. हा परवानाच नसल्याने बहुतांश महिला उमेदवार अपात्र ठरल्या होत्या. यंदा महिलांसाठी ९०२ पदे राखीव आहेत. त्यापैकी किती पदे भरली जाणार याबाबत साशंकता आहे.
 
Web Title: Sindhudurg News Recruitment of 442 posts of ST