नांदगांव - बेळणे दरम्यान रस्त्यास मोठे भगदाड

अनंत पाताडे
सोमवार, 11 जून 2018

कणकवली - माॅन्सूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यांना भेगा पडणे, रस्ते वाहून जाणे, दरड कोसळण्याच्या घटना कोकणात घडत आहेत. मुंबई -गोवा महामार्गावर नांदगांव -बेळणे दरम्यान आज पावसाच्या पाण्याने रस्त्यास मोठे भगदाड पडले आहे. 

सध्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवास करणे धोक्याचे होते. आता तर पावसामुळे रस्ता कुठे खचेल आणि कोठे भगदाड पडेल हे सांगता येणे कठीण आहे. यातून मोठ्या दुर्घटनेचीही शक्यता निर्माण झाली आहे. नांदगाव-बेळणे दरम्यान रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. पण याकडे प्रशासनाकडून मात्र डोळेझाक केली जात आहे.

पावसाचा जोर वाढल्यास रस्ता पूर्ण खचू शकतो. मोठ्ठा खड्डा पडल्यास रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी याकडे त्वरीत लक्ष देऊन त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. 

- रविराज मोरजकर, वाहनधारक

Web Title: Sindhudurg News road damage near Nandgaon - Belane