कणकवलीत डॉक्‍टरांच्या घरातून अडीच लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

कणकवली - शहरातील डॉ. कीर्ती नागवेकर यांच्या घरातून अडीच लाखांची रोकड लंपास झाली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी ६ ते १० मे या कालावधीत झाली आहे. याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. 

त्यानुसार पोलिसांनी नयना नारायण तांबे (रा. आंब्रड बौद्धवाडी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात डॉ. नागवेकर यांचे मोठे रुग्णालय आहे. दिवसाकाठी आलेली रोख रक्कम नेहमीप्रमाणे घराच्या कपाटात ठेवली जाते; मात्र ६ ते १० मे या कालावधीत रोख रकमेची तपासणी केली नव्हती. १० मे रोजी रोख रकमेसाठी ड्रॉवरची पाहणी केली असता रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. 

चोरीनंतर मोलकरीण गैरहजर
नयना २०१४ पासून डॉ. नागवेकर यांच्याकडे घरकाम करतात. डॉ. नागवेकर यांनी रोख रक्कम बेडरूममध्ये कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. ती चोरीस गेली. याबाबत नयना यांना विचारणा केली असता त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. चोरीची विचारणा केल्यानंतर संशयित नयना घरकामासाठी पुन्हा आलेल्या नाहीत. त्यामुळे संशय घेऊन त्यांच्‍याविरोधात फिर्याद दिली.

Web Title: Sindhudurg News robbery incidence in Kanakawali Doctors house

टॅग्स