सिंधुदुर्गात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

सावंतवाडी - जिल्ह्यातील शेकडो शाळांतील मुलांनी आज आपल्या मनातील उमलत्या कल्पनांना रंगांचे पंख लावले. "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला जिल्ह्याभरातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सावंतवाडी - जिल्ह्यातील शेकडो शाळांतील मुलांनी आज आपल्या मनातील उमलत्या कल्पनांना रंगांचे पंख लावले. "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला जिल्ह्याभरातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

राज्यस्तरीय "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला सकाळी 9 वाजता सुरवात झाली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी चित्र काढण्यासाठीची असलेली उत्सुकता लागून राहिली होती. चार गटांत झालेल्या या स्पर्धेला सर्वच मुलांनी चित्रे रेखाटण्याचे साहित्य व रंग कामाचे साहित्य सोबत आणले होते. त्याची योग्यप्रकारे ठेवण सर्वच विद्यार्थी करत होते. जिल्ह्यातील ठिकठिकाणी झालेल्या या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. कोणता विषय निवडणार, कोणते चित्र काढणार, त्यासाठी कोणता रंग निवडणार अशी उत्कंठा लागून राहिली होती.

आजचा वार रविवार सुटीचा असल्यामुळे हा रविवार मुलांनी चित्राच्या दुनियेत एन्जॉय केला. चित्राच्या दुनियेची ही सफर आनंदाने अनुभवली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर तसेच शाळांमध्ये ही "सकाळ'ची स्पर्धा झाली. चित्रे काढताना विद्यार्थी एकमेकांत कुजबूज करत होते. चित्रांना रंग कोणता द्यायचा व किती द्यायचा, याचीही चर्चाही करत होते. 

जिल्ह्यातील कळसुलकर इंग्लिश स्कूल, मदर क्विन्स स्कूल, भोसले इंटरनॅशनल स्कूल, माजगाव हायस्कूल, विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस, मळगाव हायस्कूल, आंबोली पब्लिक स्कूल, कुणकेरी हायस्कूल, जनता विद्यालय तळवडे, व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल बांदा, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, सांगेली नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, युनियन इंग्लिश स्कूल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव (ता. कुडाळ), शिरोडा येथील गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय, कुडाळ हायस्कूल, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, वेंगुर्ले मदर तेरेसा इंग्लिश स्कूल, टोपीवाला हायस्कूल, आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, भरतगडइंग्लिश स्कूल, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, कणकवली एस. एम. हायस्कूल, विद्यामंदिर हायस्कूल, सेंट ऊर्सुला हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूल, शिवडाव हायस्कूल, बाल शिवाजी इंग्लिश स्कूल, सद्‌गुरू भालचंद्र महाराज कणकवली शाळा क्रमांक 3, जामसंडे जोशी विद्यामंदिर, जामसंडे हायस्कूल, देवगड हायस्कूल, वाडा हायस्कूल, प्राथमिक शाळा वाडा, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, माधवराव पवार कोकीसरे हायस्कूल, केंद्रशाळा खांबाळे, विद्यामंदिर नारकरवाडी, दत्तमंदिर शाळा वैभववाडी आदी शाळांनी यासाठी सहकार्य केले. 

अमित कुबडे, श्री. आंबेसकर, श्री. आंबडोसकर, सौ. साळगावकर, छाया परब, वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे श्री. गुडेकर, आंबोली शाळेचे श्री. पाटील, सागर चव्हाण, श्री. केसरकर, श्री. गावकर, अनिल चव्हाण, अक्षता अ. चव्हाण, बाळासाहेब पाटील, विनायक मांजरेकर, सूर्यकांत टेमकर, अनिल निखार्गे, महेश गोवेकर, सुरेश गावडे, विल्सन बार्देसकर, सुषमा पालव, प्रसाद महाले आदी. 

कुडाळ - बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कानडे, जागृती सावंत, रेश्‍मा घाडीगावकर, पूजा गोसावी, वैभवी नाईक, रिमा राणे यांनी सहकार्य केले. या ठिकाणी 115 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

मालवण - "सकाळ'तर्फे आज घेतलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेस तालुक्‍यातील मालवण, मसुरे, आचरा येथील केंद्रांवर स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध गटांत 785 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग देत विविध विषयांवरील चित्रे रेखाटली. 

गेली अनेक वर्षे "सकाळ'तर्फे लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच दर्जेदार चित्रकार घडावेत यादृष्टीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षीही या स्पर्धेस बालचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केली. पहिल्या गटात माझे घर, मोबाईल, वन लाइफ लव्ह ईट यासारख्या विषयांवर स्पर्धकांनी चित्रे रेखाटली. अन्य गटात पावसाळ्यातील दृश्‍य, किल्ला, आवडता सण यासारख्या विषयांवर चित्रे रेखाटली. सकाळपासून विविध केंद्रांवर सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध गटांतील बालचित्रकार रंग-रेषांच्या दुनियेत हरवून गेल्याचे चित्र होते. आपले चित्र उठावदार, आकर्षक कसे बनेल यादृष्टीने अनेक स्पर्धक मन लावून चित्र रेखाटताना दिसत होते. 

मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहातील केंद्रावर अ गटात 93, ब गटात 128, क गटात 37 तर ड गटात 18 स्पर्धकांनी सहभाग दिला. या गटात एक मतिमंद विद्यार्थिनीचाही सहभाग होता. या केंद्रावर बातमीदार प्रशांत हिंदळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कुडाळकर हायस्कूलच्या शिक्षिका सारिका शिंदे, टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक बी. जी. सामंत, भंडारी हायस्कूलचे शिक्षक अरविंद जाधव उपस्थित होते. शहरातीलच जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल या दुसऱ्या केंद्रावरही स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यात अ गटात 95, ब गटात 98, क गटात 101 तर ड गटात 76 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका सौ. मेघना जोशी यांच्यासह सहकारी शिक्षकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले. तालुक्‍यातील मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल या केंद्रावरही स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात अ गटात 12, ब गटात 14, क गटात 24 तर ड गटात 14 स्पर्धक सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे यांच्यासह अन्य सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले. आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर झालेल्या स्पर्धेत अ गटात 19, ब गटात 22, क गटात 21 तर ड गटात 13 स्पर्धक सहभागी झाले होते. याठिकाणी प्रशालेच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले. 

Web Title: Sindhudurg News Sakal Chitrakala Competition