ओव्हरलोड वाळूची वाहतूक करणारे 9 डंपर सावंतवाडीत ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

याबाबत चौकशी सुरू असून मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे.

सावंतवाडी : बनावट पास तयार करून ओव्हरलोड वाळूची वाहतूक करणारे तब्बल 9 डंपर ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज सायंकाळी सात वाजता सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आली.

हा सर्व प्रकार माडखोल ग्रामस्थाकडून उघड करण्यात आला. यात बड्या धेड्यांच्या गाडयाचा समावेश आहे. याबाबत चौकशी सुरू असून मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे. या गाड्या गोवा ते कोल्हापूर अशा जात होत्या, अशी माहिती तहसीलदार सतिश कदम यांनी दिली.

Web Title: sindhudurg news sand overload trucks seized sawantwadi