पदवीधर निवडणुकीत अतिआत्मविश्‍वास नाही - संदेश पारकर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

वैभववाडी - अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते याचा अनुभव आम्ही घेतलाय. त्यामुळे पदवीधर निवडणुक पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते अजिबात गाफील राहणार नाही, असे मत भाजप नेते संदेश पारकर यांनी येथे व्यक्त केले.

वैभववाडी - अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते याचा अनुभव आम्ही घेतलाय. त्यामुळे पदवीधर निवडणुक पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते अजिबात गाफील राहणार नाही, असे मत भाजप नेते संदेश पारकर यांनी येथे व्यक्त केले.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ श्री. पारकर आज येथील तालुक्‍याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तालुक्‍यातील शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांची भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, सुधीर नकाशे, सुहास सावंत, सज्जन रावराणे, प्रवीण पेडणेकर, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.

श्री. पारकर म्हणाले, ""कोकण पदवीधर मतदारसंघातुन भाजपचे उमेदवार श्री. डावखरे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांनी गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक संघटनानी पाठींबा दिला असल्याने ते मोठ्या मताधिक्कयाने निवडुन येतील.''

हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. तरी देखील कधी नव्हे एवढा प्रचार का केला जात आहे असा प्रश्‍न श्री.पारकर यांना विचारला असता त्यांनी अतिआत्मविश्‍वासामुळे काय होते ते आम्ही अनुभवलय त्यामुळे ही निवडणुक गांभीर्याने घेत प्रचारयंत्रणा पक्षाने चोखपणे लावली आहे.

श्री. डावखरे यांचा संपर्क नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे असे विचारले असता ते म्हणाले, ""56 तालुके या मतदारसंघात आहेत. प्रत्येक ठिकाणी पोहोचणे त्यांना शक्‍य होत नाही; मात्र तरीदेखील जर काही राहुन गेले असेल तर ती जबाबदारी यापुढे आमची आहे.''

Web Title: Sindhudurg News Sandesh Parkar comment