सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

सावंतवाडी तालुक्‍यातील मळगाव देऊळवाडी येथे शुक्रवारी रात्री उशिरा पाच फूटांची मगर आढळली आहे.

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) - सावंतवाडी तालुक्‍यातील मळगाव देऊळवाडी येथे शुक्रवारी रात्री उशिरा पाच फूटांची मगर आढळली आहे.

मळगाव देऊळवाडीतील भरवस्तीत मगर आढळली आहे. शुक्रवारी मगर आपल्या घरात शिरताना काही ग्रामस्थांनी आढळून आले. त्यांनी याबाबत वनिविभागाला कळविले. वनविभागाने आज पहाटे साडे तीनच्या सुमारास तिला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या कामी यावेळी वनविभागाचे कर्मचारी बबन रेडकर, सावंत यांना ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Web Title: sindhudurg news sawantwadi news marathi news sakal news