‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाचा आज वर्धापनदिन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

सावंतवाडी - येथील सकाळच्या विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन आज (ता.२३) साजरा होणार आहे. यानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान ‘ माझे मायबाप’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे.

सावंतवाडी - येथील सकाळच्या विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन आज (ता.२३) साजरा होणार आहे. यानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान ‘ माझे मायबाप’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे.

‘सकाळ’ने सिंधुदुर्गाशी पत्रकारितेच्या माध्यमातून वेगळे नाते निर्माण केले आहे. येथील सर्वसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याबरोबरच सिंधुदुर्गचा विकास कसा असायला हवा, याला दिशा देण्याचे कामही ‘सकाळ’ने अनेक वर्षे केले. जिल्ह्यातील पर्यटनाची दिशा, आरोग्यविषयी प्रश्‍न,पर्यावरण याबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचे धोरण कसे असायला हवे याच्याविषयी ‘सकाळ’ने नेहमीच आग्रही भूमिका घेतली. गेल्या वर्षभरात ‘सकाळ’ने जिल्ह्याचा आरोग्य प्रश्‍न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास बरेच आरोग्यविषयी प्रश्‍न सुटू शकतात, असे पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हावासियांसमोर मांडले. यातून जनरेटा वाढू लागला आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनीही याबाबत विचार सुरू असल्याचे जाहीर केले आहे. या आणि अशा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अनेक विषयांवर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला. वाचक, हितचिंतकांच्या पाठबळावर जिल्ह्यात ‘सकाळ’ भक्कम पाय रोवून आहे.

सायंकाळी स्नेहमेळावा
‘सकाळ’च्या येथील कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी पाच ते रात्री आठदरम्यान येथील कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. याला वाचक, हितचिंतक, जाहीरातदार, विक्रेते यांसह सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Sindhudurg News sawantwadi office Anniversary