सावंतवाडीत ओढ्याला अचानक पूर आल्याने कपडे धुणारी महिला गेली वाहून

अमोल टेंबकर
शुक्रवार, 14 जुलै 2017

अचानक पाणी वाढल्याने त्यांना अंदाज आला नाही.

सावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडी येथील महिला कपडे धुत असताना पाय घसरल्याने ओढयात वाहून गेली.

हा प्रकार आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हेळेकर प्रिंटर्सच्या मागील भागात घडला. प्रतिभा प्रभाकर माळकर (वय 45) असे त्या महिलेचे नाव असून, त्या कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवसाी आहे. तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावरच ओढ्याच्या पाण्यामध्ये कपडे धुण्यासाठी त्या गेल्या होत्या. 

सातत्याने पाऊस पडत असल्याने येथील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. अचानक पाणी वाढल्याने त्यांना अंदाज आला नाही. यामुळे त्यांच्या मुलीसमोरच हा प्रकार घडला. आरडाओरड करूनसुद्धा आईला वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शोध कार्य सुरू असून, पोलिस येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेत आहेत. 

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: sindhudurg news sawantwadi woman washing cloths drowns in stream