शिरोड्यात पावसामुळे मिठागरे अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

शिरोडा - दशक्रोशीत बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि गुरुवारचे दमटी हवामान याचा परिणाम मीठ उत्पादनावर झाला आहे. मिठागरे थंड पडल्याने मीठ तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

शिरोडा - दशक्रोशीत बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि गुरुवारचे दमटी हवामान याचा परिणाम मीठ उत्पादनावर झाला आहे. मिठागरे थंड पडल्याने मीठ तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

जिल्ह्यात एकमेव शिरोडा येथेच समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. आयोडिनयुक्त मीठाचा वापर वाढत चालल्याने या मिठागरातील पांढऱ्या (खाण्याच्या) मिठाची मागणी दिवसेंदिवस घटू लागली आहे. मिठागर बसविण्यासाठी सुरवातीच्या काळात हजारो रुपये गुंतवावे लागतात. गेल्या काही दिवसांपासून काळे मीठ तयार होण्यास सुरवात झाली आहे.

बुधवारी (ता. १४) तिन्हीसांजेला झालेल्या पावसाचा शिडकाव तद्‌नंतर मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गुरवारचे दिवसभरातील दमट हवामान यामुळे मीठ तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. मीठ उत्पादन हंगामाच्या प्रारंभीच मिठागरवाल्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती मीठ उत्पादक राजन गावडे, मुरलीधर गावडे, गुंडू परब आदींनी दिली.

या अवकाळी पावसाचा परणाम आंबा, काजू पिकावर होणार असून दमटी हवामानामुळे तुडतुड्यांचे प्रमाण वाढणार. फलधारणा प्रक्रिया लांबल्याने आंबा पीक उशिराने येणार. परिणामी बागायतदारांचे, आंबा व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याची माहिती आंबा बागायतदार सचिन गावडे यांनी दिली.

Web Title: Sindhudurg news sea salt production stop due to rains