यावर्षी येणार मोठी उधाणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मालवण - जिल्ह्याच्या किनारपट्टीवर यावर्षी पावसाळ्यात १९ दिवस मोठी समुद्री उधाणे येणार आहेत. या दिवशी किनारपट्टीवरील भागात २.३० मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्‍यता आहे.

मालवण - जिल्ह्याच्या किनारपट्टीवर यावर्षी पावसाळ्यात १९ दिवस मोठी समुद्री उधाणे येणार आहेत. या दिवशी किनारपट्टीवरील भागात २.३० मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. या पावसाळ्यातील १५ दिवस किनारपट्टी भागांसाठी सर्वाधिक धोक्‍याचे असणार आहे. कारण या दिवशी २.५० मीटर पेक्षाही उंचीच्या समुद्री उधाणाच्या लाटा किनारपट्टी भागात धडकणार आहेत.

पावसाळी कालावधीत पूर परिस्थितीमुळे अथवा समुद्री उधाणामुळे कोणतीही आपत्ती उद्‌भवल्यास ती निवारण्यासाठी प्रशासनातर्फे दिवस-रात्र २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत राहणार आहे. 

किनारपट्टी भागात पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येते. याचा फटका किनारपट्टीवरील नागरिकांना दरवर्षी बसतो. समुद्र किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांमुळे किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी शिरते. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकवस्तीत, शेती जमिनीत  व बागायतींचे नुकसान होत असते.  मुसळधार मोठा पाऊस झाला तर आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनही सतर्क झाली आहे. बंदर विभागाकडून जारी केलेल्या भरती ओहोटीच्या वेळापत्रकानुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला सुमारे २६ दिवस मोठी उधाणे होणार आहेत. यातील १५ दिवस किनारपट्टी भागांसाठी धोक्‍याचे असणार आहे.  

यादिवशी २.५० मीटर पेक्षाही उंचीच्या समुद्री उधाणाच्या लाटा किनारपट्टी भागात धडकणार आहेत. १४ व १५ जुलैला मोठी भरती असणार आहे. यादिवशी दुपारी २.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. याच काळात किनारपट्टी भागात अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्याच्या मुखांजवळील गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

२.३० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या उधाणाचे दिवस 
भरती व ओहोटीचे वेळापत्रक असे  ः १२ जुलैला सकाळी १०.३९ वाजता २.४१ मीटर. १३ ला दुपारी ११.२५ वाजता २.५५ मीटर. १४ ला - दुपारी १२.०९ वाजता २.६४ मीटर. १५ ला - दुपारी १२.५१ वाजता २.६६ मीटर. १६ ला १.३२ वाजता २.६२ मीटर. १७ ला २.१३ वाजता २.५१ मीटर. १८ ला २.५६ वाजता २.३७ मीटर. १० ऑगस्टला सकाळी १०.२३ वाजता २.३६ मीटर. ११ ला- सकाळी ११.०८ वाजता २.५० मीटर. १२ ला - दुपारी ११.५० वाजता २.५९ मीटर. १३ ला दुपारी १२.३० वाजता २.६१ मीटर. १४ ला दुपारी १.०८ वाजता २.५७ मीटर. १५ ला दुपारी १.४४ वाजता २.४५ मीटर. ९ सप्टेंबरला सकाळी १०.०१ वाजता २.३२ मीटर. ९ ला सकाळी १०.४५ वाजता २.४३ मीटर. १० ला दुपारी ११.२५ वाजता २.५० मीटर. ११ ला दुपारी १२.०३ वाजता २.५७ मीटर. १२ ला दुपारी १२.३८ वाजता २.४५ मीटर. १३ ला दुपारी १.११ वाजता २.३२ मीटर.
 

Web Title: SIndhudurg News sea water level issue