शिवनेरीवरून आणलेल्या ज्योतीचे देवरुखात स्वागत 

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

साडवली - देवरुख सोळजाई मंदिर देवस्थानच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी शिवनेरीहून देवरुखपर्यंत ज्योत आणली. सुमारे चारशे किलोमीटर दौड करून आणलेल्या या ज्योतीचे देवरूखात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 

साडवली - देवरुख सोळजाई मंदिर देवस्थानच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी शिवनेरीहून देवरुखपर्यंत ज्योत आणली. सुमारे चारशे किलोमीटर दौड करून आणलेल्या या ज्योतीचे देवरूखात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

मंदिर परिसरातील क्रांतीनगर रहीवासी मित्रमंडळाचे ४० कार्यकर्ते ही ज्योत आणण्यासाठी गेले होते. चार दिवसांचा दौडीचा प्रवास करून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ही ज्योत देवरुख शहरात दाखल झाली. देवरुखवासियानी तसेच देवस्थान कमिटीने या ज्योतीचे जंगी स्वागत केले. बाजारपेठेतून नागरीक व सुवासिंनींनी ही ज्योत मंदिरापर्यंत आणली. सलग पाच वर्ष ही ज्योत आणली जाणार असुन एक वर्ष ही ज्योत दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन आणली जाणार आहे. असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

Web Title: Sindhudurg News Shivjyot well comes in Devrukh