सिंधुदुर्गला मिळाले सव्वाशे कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजनचा २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी विविध विकास कामांसाठीच्या १७९ कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी जिल्हा नियोजन विभागाकडे आले आहेत. उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीची फेब्रुवारीत बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी समितीचा १७९ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर केला व अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा आराखडा कोणताही कात्री न लावता मंजूर केला होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यात शासनाने राज्यातील सर्व नियोजन विभागांना मंजूर आराखड्याच्या ७० टक्के निधी वर्ग करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाला १७९ पैकी १२५ कोटी उपलब्ध मिळाले आहेत. निधी टप्प्याटप्याने जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत वर्ग करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३० टक्के म्हणजे ५४ कोटी डिसेंबर अखेर मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sindhudurg News Sindhudurg got 225 crores