कबड्डीसाठी स्नेहा टिळवेने पणाला लावले करिअर

कबड्डीसाठी स्नेहा टिळवेने पणाला लावले करिअर

सावंतवाडी - त्याग हा अनेक बाबतीत दिसून येतो; मात्र आपल्या खेळासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करणारी माणसे क्वचितच असतात. तेवढ्यावरच न थांबता त्याग ज्या गोष्टीसाठी केला आहे त्यात यशाला गवसणी घालून स्वप्नांची पुर्तता करणारी माणसे आपला वेगळा ठसा समाजात उमटवितात. अशीच कहाणी आहे कोलगाव येथील स्नेहा टिळवे हिची.

सध्या एस. पी. के कॉलेजला तृतीय वर्षाला शिकत असलेल्या स्नेहाने राष्ट्रीयस्तरावर झालेल्या विद्यापीठ अंर्तगत कबड्डी स्पर्धेत यशाला गवसणी घातली आणि याच यशाच्या जोरावर तिने मुंबई विद्यापिठाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान मिळविला. अशी किमया सिंधुदुर्गात आधी कोणीच साधली नव्हती. त्यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदानाचा वर्षाव झाला. यासाठी तिला मात्र कठोर परिश्रम घ्यावे लागले. शिवाय यासाठी तिला नर्सिगचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. स्नेहाचे गाव शहरापासून जवळच असलेल्या कोलगाव हे आहे. 

लहानपणापासून ते दहावीपर्यंत तिचे शिक्षण आर पीडी हायस्कूलमध्ये झाले. दरम्यानच्या काळात तिला प्रशिक्षकांकडून कबड्डीचे धडे मिळाले. तिने याच काळात तालुकास्तरावर जिल्हास्तरावर आपले नाव कमावले. दहावीत असताना पहिल्या सबज्युनिअर स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली. दहावी नंतर सायन्सकडे गेलेल्या स्नेहाने आपल्या आत्याच्या सांगण्यावरुन बारावीनंतर नर्सिंगचे क्षेत्र निवडले. यासाठी तिने मुंबईच्या केईएम कॉलेजलमध्ये प्रवेशही घेतला; मात्र कुठेतरी आपल्या करीअरच्या क्षेत्राला खिळ बसते की काय असाही विचार मनात आला. 

केरळमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावून यशाला गवसणी घातली. यानंतर उत्तरप्रदेश येथे झालेल्या फेडरेशन नॅशनल कबड्डी स्पर्धा २०१५ लागली. त्यातही तिने चमकदार कामगिरीचा परीचय दिला. ऑक्‍टोबर २०१७ मध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी स्पर्धेतही पश्‍चिम विभागाकडून खेळताना पुन्हा एकदा आपल्या खेळाने सर्वाचे डोळे दिपवले. श्रमाचे फळ म्हणून तिला राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत चक्क मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला. तिच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट खेळ करताना संघाने रौप्य पदक मिळवून ऑल इंडिया इंटर युनिर्वसिटीच्या स्पर्धेत खेळण्यासाठी आपले स्थान निश्‍चित केले आहे. 

या यशात अनेक अडचणी व अपयशांचा सामना करावा लागला असल्याचे तिने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आपल्या यशामागे शाळा व महाविद्यालयाचा पाठिंब्यामुळेचहे यश मिळवू शकले, असे सांगितले. कबड्डीपटू घडण्यामागे तिने शैलेश नाईक, संजय पेडणेकर, दिनेश चव्हाण, यशवंत पास्ते, मुंबई उपनगरचे सुहास जोशी, छत्रपती पुरस्कार मिळालेले तारक राऊळ, रविंद्र करंबळकर या सर्व प्रशिक्षकांचा आर्वजुन उल्लेख केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com