सोनाबाई पाटील मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

आंबोली - सोनाबाई पाटील मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी आेरोस पोलिस स्थानकासमोर ग्रामस्थ व नातेवाईकांनी उपोषण सुरू केले आहे. 

आंबोली - सोनाबाई पाटील मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी आेरोस पोलिस स्थानकासमोर ग्रामस्थ व नातेवाईकांनी उपोषण सुरू केले आहे. 

आंबोली नांगरवाक येथील अतिक्रम हटाव सुरू असताना पोलिस व ग्रामपंचायतीकडून सोनाबाई पाटील यांना मारहाण झाली होती असा आरोप  त्यांचा मुलगा भाऊ पाटील यांनी केला आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती पण ती दाखल करून घेण्यात आली नाही. त्यानंतर चारच दिवसांनी जिल्हा रुग्णालयात सोनाबाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधीतावर कारवाई करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा भाऊ पाटील यांच्यासह नातेवाईकांनी घेतला आहे. यावरून त्यांनी आंदोलन छेडले आहे. 

दरम्यान  सोनाबाई पाटील मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी ओरोस मुख्यालय पोलीस स्थानकात ग्रामस्थ व नातेवाईकांनी 4 दिवस ठिय्या धरला होता, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने आजपासून ओरोस पोलीस स्थानकासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ, तसेच मृताचे नातेवाईक मुलगा भाऊ पाटील, गणपत पाटील, नातू संतोष पाटील, महेश कोकरे, सुरेश यमकर, ज्ञानेश्वर पाटील आदींसह जवळपास 50 जणांनी सहभाग नोंदविला आहे. 

Web Title: Sindhudurg News Sonabai Patil death incidence issue