वादळाने काजू बागायतीवरही संकट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

सावंतवाडी - ओखी वादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यासह देवगड व वेंगुर्लेत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे ऐन मोहोर फुलण्याच्या टप्यातच आंब्यासह काजु बागायतीवर संकट कोसळले आहे.

सावंतवाडी - ओखी वादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यासह देवगड व वेंगुर्लेत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे ऐन मोहोर फुलण्याच्या टप्यातच आंब्यासह काजु बागायतीवर संकट कोसळले आहे.

पावसामुळे तुडतुडा व करपा होण्याची शक्‍यता फळ संशोधन केंद्राकडून वर्तविण्यात आली असून बागायतीवरील रोग कमी करण्याठी योग्य प्रमाणात औषध फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्याला ओखी वादळाच्या तडाख्यामुळे पुन्हा एकदा ऐन थंडी हंगामात ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागला. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. आंबा, काजुला योग्य अनुकुल वातावरणाचे संकेत अद्यापही दिसून येत आहे. त्यामुळे आंब्यासह काजुवरीही आता संकट कोसळले आहे. आंबा पिकावर तुडतुडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर पावसामुळे कोवळ्या पालवीवर करपा रोगाची वाढ होण्याची शक्‍यताही फळ संशोधन केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. पाऊस थांबताच फवारणी केल्यास काही प्रमाणात किटकनाशक व बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करावी, असे सुचविण्यात आली आहे.

आंब्या पिकावर लॅण्डा सायहॅलोथ्रीन १० लीटर पाण्यात ६ मिली या किटकनाशकासोबत कार्बेन्डॅझिन आणि मेनकोझेब हे दोन्ही घटक एकत्रितपणे बुरशीनाशक १० लीटर पाण्यात १० ग्रॅम अशी फवारणी करावी. किंवा हेक्‍झॉकोनॅझोल १० लीटर पाण्यात ५ मिली अशा प्रमाणात बुरशीनाशकांची मिसळून फवारणी करण्याचे सुचिवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या द्रावणात अर्धा मिली प्रति लीटर या प्रमाणात स्टीकर मिसळावे.

काजुवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. ज्या शेतकऱ्याच्या पालवी आहे अशा शेतकऱ्यानी पालवीवर मोनोकोटोफ्रॉस ३६ टक्के प्रवाही १० लीटर पाणी घेवून फवारणी करण्याचे सुचविण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये काजुना मोहोर आहे त्यांनी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मिली प्रती १० लीटर पाण्यात घेवून फवारणी करावी असे वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राने सुचविले आहे. अशा प्रकारे फवारणी केल्यास काही प्रमाणात होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावात रोक निर्माण केली जावू शकते.

Web Title: Sindhudurg News storm effects on cashunut